ETV Bharat / state

पावसाळ्यात पाणी टंचाई : औरंगाबादेत पाण्याचा ठणठणाट; मुख्यमंत्र्यांनी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे केले होते उद्घाटन

१६ लाख लोकसंख्या असणाऱ्या औरंगाबाद शहरातला दिवसाला २४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरात पाणी साठवण्यासाठी जलकुंभ नाहीत. सध्या ५९ जलकुंभ असून यातील १७ जलकुंभ वापरात आहेत. यामुळे दिवसाला १३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. यातून पाणीपुरवठा दरम्यान २० टक्के पाण्याची गळती होते. यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.

water shortage in Aurangabad city
भर पावसाळ्यात औरंगाबादेत पाण्याचा ठणठणाट
author img

By

Published : Jul 26, 2021, 8:16 AM IST

औरंगाबाद - शहराला काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाणपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना नागरिकांना टँकरचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन थाटात केले होते. मात्र, आजही शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून शहरात पाण्याचा ठणठणाट आहे.

भर पावसाळ्यात औरंगाबादेत पाण्याचा ठणठणाट

शहरात ५९ पैकी फक्त १७ जलकुंभ वापरात -

१६ लाख लोकसंख्या असणाऱ्या औरंगाबाद शहराला दिवसाला २४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरात पाणी साठवण्यासाठी जलकुंभ नाहीत. सध्या ५९ जलकुंभ असून यातील १७ जलकुंभ वापरात आहेत. यामुळे दिवसाला १३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. यातून पाणीपुरवठ्या दरम्यान साधारण २० टक्के पाण्याची गळती होते. यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.

जायकवाडी धरणात मुबलक पाणी -

जायकवाडी धरणातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जायकवाडी धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पुढील काही दिवस शहराला पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तर हर्सूल येथील तलाव देखील पावसाने भरला आहे. या तलावातून शहरातील काही जुन्या भागाला पाणीपुरवठा केला जातो.

अनेक भागात आजही टँकरने पाणीपुरवठा -

आशिया खंडात वेगात विकसित होणारं औद्योगिक शहर म्हणून औरंगाबाद शहराला ओळखले जाते. शहरात चार मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. शहराचा वेगाने विकास होत आहे. मात्र, आजही शहरातील अनेक भागात नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. शहरातील नव्याने झालेल्या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची यंत्रणा पोहोचलेली नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये चिकलठाणा, पुंडलिक नगर, सातारा परिसर, हर्सूल, जटवाडा, बेगमपूरा, पहाडसिंगपूरा, जय भवानी नगर, भवसिंगपूरा, पडेगाव, बीड बायपास इत्यादी भागांचा समावेश आहे. शहरातील तीन ते चार लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवले जाते. यासाठी नागरिकांकडून आगाऊ शुल्क वसुली केली जाते.

मुख्यमंत्र्यांनी थाटात उद्घाटन केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही सुरूच -

राज्य शासनाने २०१९ जुलैमध्ये औरंगाबाद शहरासाठी औरंगाबादसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. या योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे कामाला सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणापासून औरंगाबाद शहरापर्यंत संपूर्ण नवी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ९११ किलोमीटर पाईपलाईन बसवली जाणार आहे. या योजनेची रचना आणि डिझाइन हे आगामी काळात शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे. या योजनेमुळे ६०५ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा होऊ शकतो. तसेच शहरात पाणीसाठा करण्यासाठी ५२ पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. यामध्ये चार जलकुंभ हे जमिनीत उभारले जाणार आहेत. जलकुंभांची क्षमता २५ लाख दशलक्ष लीटर असणार आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला २४ तास पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र २०१९ मध्ये मंजूर झालेल्या योजनेचं काम अद्यापही झालेलं नाही. यामुळे या योजनेतून शहराला २४ तास पाणीपुरवठा होईल हे नागरिकांसाठी मृगजळच ठरत आहे.

मनसेने कापले होते आयुक्तांच्या नळाचे कनेक्शन -

शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होते. जायकवाडी धरणात पाणीसाठा आहे. मात्र, शहरात सुरळीत पाणी पुरवठा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणी टंचाईकडे लक्ष वेधले होते. आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्याची मागणी पक्षाने केली होती. त्यासाठी महापालिकेला दहा दिवस मुदत देण्यात आली होती. या मागण्यांवर मनपाने कार्यवाही केली नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय निवासस्थानाची जलवाहिनी कापली होती.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात संततधार पावसानंतरही पाणी कपात कायम, गंगापूर धरणाच्या साठ्यात 13 टक्के वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.