ETV Bharat / state

पेट्रोल पंपावरील वॉचमनची गळफास घेऊन आत्महत्या - पेट्रोल पंपावरील वॉचमनची आत्महत्या

पेट्रोल पंपावरील एका वॉचमनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बीड बायपास रोडवर घडली.

watchman suicide in aurangabad
पेट्रोल पंपावरील वॉचमनची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jul 8, 2020, 3:43 PM IST

औरंगाबाद - पेट्रोल पंपावरील एका वॉचमनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बीड बायपास रोडवर घडली. आकाश भगवान भडांगे (२०, ह. मु. बाळापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवाजी घुगे यांच्या पेट्रोल पंपाचे सध्या बीड बायपास रोडवर काम सुरु आहे. त्यांची एक अपघातग्रस्त कार पंपाच्या आवारात उभी आहे. ही कार घेऊन मंगळवारी सकाळी आकाश चक्कर मारण्यासाठी गेला. त्यावेळी कार पंपासमोरील दुभाजकावर धडकली. त्यामुळे कारचे नुकसान झाले. या घटनेची माहिती पंपावरील कामगारांनी मालक घुगे यांना दिली. त्यावर घुगे यांनी अपघातग्रस्त कार गॅरेजमध्ये लावा असे सांगितले. तसेच आकाशला ही कार अपशकुनी आहे. त्यामुळे ही कार येथेच उभी करुन ठेवली होती. ती का बाहेर काढली असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे आकाशने पंपाच्या आवारातील बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच घुगे व कामगारांनी आकाशला बेशुध्दावस्थेत हेडगेवार रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती बिकट असल्याने त्याला घाटीत नेण्यात आले. त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आकाश पेट्रोल पंपावर वॉचमन म्हणून काम करत असल्याची माहिती घुगे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.