औरंगाबाद : सर्वत्र उत्साहात दिवाळीचा सण साजरा होत असताना पळशी येथील शेतकऱ्यांनी मात्र भाजीचा एक आगळावेगळा स्टॉल लावला ( Farmers protest in Diwali festival ) आहे. या स्टॉलमध्ये खराब भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सणासुदीला खिशात पैसे नाही, त्यामुळे खराब भाजीपाला सरकारने विकत घेऊन आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल : गेल्या काही दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातला आहे. विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस बरसल्याने हातात तोंडाशी आलेले पीक खराब झाली ( Crop damaged due to rain ) आहेत. फळभाज्या बाजारपेठेत विक्रीला नेल्या तर त्यांनाही भाव मिळत नाही. शेतात उभे पिक अतिपावसामुळे खराब झाली. असल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न? शेतकऱ्यांपुढे पडला आहे. मका, कांदा, टॉमेटो, सोयाबीन ही सर्व पीके खराब झाली आहेत. त्यामुळे वर्ष काढायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
पळशीच्या शेतकऱ्यांनी लावली दुकान : दिवाळीचा दिवस असून शेतकऱ्यांचा खिशात खर्चाला पैसे नाहीत. शेतीमालाला भाव मिळेल ना आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आलेली पिक हाताशी लागेना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतात खराब झालेले टॉमेटो, मका, बाजरी, सोयाबीन ही सर्व पिके घेऊन पळशीच्या शेतकऱ्यांनी एक स्टॉल उभा ( waste vegetable stalls) केला. यामध्ये खराब भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. सरकारने सर्व शेतमाल विकत घेऊन दिवाळीसाठी पैसे द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने दिवाळी साजरा करता येत नाहीये. तर दुसरीकडे कुटुंबीयांना नवीन कपडे फटाके किंवा किराणा सामान आणायला पैसे नाहीत. सरकारने स्वस्तात किट देण्याचा आश्वासन दिले असले, तरी ते घेण्यापुरते देखील पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टॉल लावल्याचे पळशी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
कृषी मंत्र्यांनी टाळली भेट : कृषिमंत्री अब्दुल सत्तार रविवारी सायंकाळी पळशी येथे येणार होते. त्यामुळे आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडण्याकरिता शेतकरी, त्या भागात जमा झाले होते. मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता कृषीमंत्र्यांनी ऐनवेळी आपला दौरा रद्द केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आमचे म्हणणे ऐकण्यासाठी कृषिमंत्र्यांना वेळ नाही तर मग न्याय मागचा कोणाला? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.