ETV Bharat / state

औरंगाबादेतील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मॅनेजरने ५८ किलो सोने केले लंपास; चौघांविरोधात गुन्हा दाखल - सोने

गेल्या सहा महिन्यांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्समधील व्यवहारात अनियमितता आढळली. त्यामुळे याबाबत ऑडीट केले असता गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Jul 4, 2019, 4:37 PM IST

औरंगाबाद - शहरातील समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मॅनेजरने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने २७ कोटी ३१ लाख रुपयांचे ५८ किलो सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना अटक केली आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले

अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन असे तीन आरोपींची नावे असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्समध्ये अंकुर राणे हा मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर दुकानाची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने, हिरे, दाग-दागिन्यांची विक्री आणि व्यवहार सर्वकाही राणेच सांभाळत होता. गेल्या सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारात अनियमितता आढळली. त्यामुळे याबाबत ऑडीट केले असता गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

पेठे ज्वलेर्सचे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा केल्यानंतर ५८ किलो सोने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेठे यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही तासात अंकुश राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे. त्या तिघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

Intro:
समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये म्यानेजरनेच इतर तीन सहकार्याच्या मदतीने 27 कोटी 31 लाख रुपयांचे 58 किलो सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी तीन आरोपिना अटक केली आहे
अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन, व एक महिला (सर्व राहणार औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

Body:समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्स मध्ये अंकुर राणे हा म्यानेजर पदावर कार्यरत होता. दुकानाची सर्व जबाबदारी विश्वासेने रानेवर सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने हिरे दगदागिन्यांची विक्री व व्यवहार रानेच सांभाळत होता.मागील सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारात अनियमितता आढळल्याने या बाबत ऑडीट केली असता गैरव्ह्व्हार समोर आल्यानंतर पेठे जेवलेर्स चे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे (रा.मुंबई) यांना या बाबत माहिती मिळाली असतां त्यांनी शहानिशा केली व 58 किलो सोने लंपास असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पेठे यांच्या तक्रारी वरून क्रांतिचौक पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्र हलवीत अंकुश राणे ,राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे.तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अशी माहिती आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.