ETV Bharat / state

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; ३ लाख ७४ हजार मतदार बजावणार हक्क - पदवीधर मतदारसंघ

मराठवाडा पदवीधर मतदानाला आज सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 1,06500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/01-December-2020/9721506_388_9721506_1606794525182.png

author img

By

Published : Dec 1, 2020, 9:40 AM IST

औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 045 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 1,06500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्राबाहेर निवडणूक कर्मचारी मतदारांची शाररिक तपासणी करत आहेत. ऑक्सिजन मात्रा तपासून हातावर सॅनिटायजर लावून मतदान केंद्रावर मतदारांना प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रात गेल्यावर मतपत्रिका हाताळणीबाबत अधिकारी माहिती देत आहेत. दर दोन तासाला किती टक्के मतदान झालं याबाबत निवडणूक अधिकारी माहिती देणार आहेत.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात..

राजकीय वर्तुळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी बंड होत आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण 53 अर्ज छाननी अंती 45 वैध ठरले. तर 8 अर्ज पात्र ठरविण्यात आले.

भाजपच्या एक बंडखोरांचा अर्ज बाद तर दोन जण अद्याप मैदानात -

भाजपने शिरीष बोराळकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्यानंतर भाजपत इच्छुकांनी बंड केले. त्यामुळे प्रबळ दावेदार असलेले प्रवीण घुगे यांच्यासह माजी आमदार जयसिंग गायकवाड आणि बीडचे रमेश पोकळे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला होता. त्यापैकी शपथ न घेतल्याने प्रवीण घुगे यांचा अर्ज बाद झाला आहे. आता जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांचे बंड शमवण्याचे आव्हान पक्ष आणि अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासमोर असणार आहे.

मतदार बांधून ठेवण्यासाठी एमआयएम लढवणार निवडणूक -

औरंगाबादसह मराठवाड्यात एमआयएम पक्षाचे वाढते मतदार पाहता उच्चशिक्षित मतदार बांधून ठेवण्यासाठी एमआयएम पक्षदेखील पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. कुणाल खरात यांनी पक्षातर्फे निवडणूक अर्ज दाखल केला आहे. नांदेड महानगर पालिकेनंतर औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतदान पक्षाने मिळवत मोठा मतदार पक्षाशी जोडला आहे. त्यामुळे मतदार आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहे.

हेही वाचा -औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक: 53 उमेदवारांपैकी 8 अर्ज बाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.