ETV Bharat / state

मोबाईलला रेंज नसल्याने 'या' गावाचा मतदानावर बहिष्कार - कन्नड news

देश डिजिटल इंडियाच्या मार्गावर असतानाच औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील कळंकी या गावात मोबाईललाही रेंज नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकांपूर्वी येथे सर्वपक्षीय उमेदवार येतात आश्वासनांची खैरात देऊन जातात. मात्र, कोणत्याही प्रकारचा विकास करत नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जो पर्यंत गावात विकास होत नाही तोपर्यंत निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

गावकरी
author img

By

Published : Sep 23, 2019, 9:42 PM IST

Updated : Sep 23, 2019, 10:00 PM IST

औरंगाबाद - गावामध्ये विकास झाला नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, गावात मोबाईलला रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा अजब निर्णय औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील कळंकी गावाने घेतला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कंळकी गाव दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्याने गावाचा इतर भागांचा संपर्क होत नाही. गेल्यावर्षी गावात बीएसएनल आणि एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, एक वर्ष होऊनही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे गावात बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने कळंकी गावातील अनेक ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. या शिवाय इतर सुविधांच्या बाबतीत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा - एमआयएम विधानसभेच्या 20 टक्के जागा लढवणार - इम्तियाज जलील


कळंकी ग्रामस्थांना अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गावात मोबाईलवर संभाषण करायचे असल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर गच्चीवर जाऊन बोलावे लागते. त्यामुळे मोबाईल असूनही अनेक वेळा लोकांशी संपर्क होत नसल्याने अडचण येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले.

Intro:गावामध्ये विकास झाला नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या मात्र गावात मोबाईल रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा अजब निर्णय एका गावाने घेतलाय. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील कळंकी गावातील ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.Body:कंळकी गाव दुर्गम आणि डोंगराळ भागात हे गाव असल्याने गावाचा इतर भागांची संपर्क होत नाही. गेल्यावर्षी गावात बीएसएनल आणि एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र एक वर्ष होऊनही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे गावात बैठक घेऊन हा अजब निर्णय घेण्यात आलाय. Conclusion:मोबाईल नेटवर्क नसल्याने कळंकी गावातील अनेक ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. याशिवाय इतर सुविधांच्या बाबतीत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
कळंकी ग्रामस्थाना अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गावात मोबाईलवर संभाषण करायचं असल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर गच्चीवर जाऊन बोलावं लागत. त्यामुळे मोबाईल मुळे अनेक वेळा लोकांशी संपर्क होत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
Byte - गावकरी
Last Updated : Sep 23, 2019, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.