औरंगाबाद : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचे पाहायला मिळत (Chandrakant Patil Controversial statement) आहे. शहरात औरंगपुरा येथे काँग्रेस पक्षाने तर उस्मानपुरा भागात दलित संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
असे केले वक्तव्य : भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. सरकारवर अवलंबून राहू नका. देशामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा सुरू केल्या. त्यावेळेस त्यांना सरकारने अनुदान दिले नव्हते, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आहे. असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभर पडसाद उमटत (organizations aggressive against Chandrakant Patil ) आहेत.
संघटना आक्रमक : भाजप नेते चंद्रकांत पाटील औरंगाबादच्या पैठण येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. औरंगपुरा येथे एका आयोजित कार्यक्रमात ते आले असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळेस पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. तर उस्मानपुरा भागातील एका नियोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आले असताना आंबेडकरी संघटनांनी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. जिल्ह्यात ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणी त्यांचा विरोध दर्शवला जात (Minister Chandrakant Patil) आहे.
चुकीचा अर्थ काढला : त्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, भाऊराव पाटील यांनी कशा परिस्थितीत शाळा सुरू केल्या आणि त्या वाढवल्या याबाबत मी माहिती (Chandrakant Patil) दिली. त्यांचा आदर करून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक यानिमित्ताने मी केले. मात्र त्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जातोय. मात्र त्याकाळी लोकांकडून पैसे मागूनच शाळा सुरू करण्यात आल्या. आपण त्याला आम्ही भीक मागून आमचे काम केले, असे आपण म्हणतो. त्यात चुकीचे काही म्हणले नाही. मात्र त्याचा विपर्यास केला जातोय, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण (Various organizations aggressive) दिले.