ETV Bharat / state

मुंबई-जालना 'वंदे भारत'ची गायीला धडक, इंजिन बंद पडल्यानं एक तास रेल्वे वाहतूक विस्कळित - संतोषकुमार सोमाणी

Vande Bharat Express Hit Cow : मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला गाय धडकल्याची घटना शनिवारी (13 जानेवारी) सायंकाळी लासूर ते पोटुळदरम्यान घडली. या धडकेनंतर वंदे भारत एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडलं. त्यामुळं जवळपास एक तास ही रेल्वे जागेवरच उभी होती.

vande bharat express hit cow near sambhajinagar
मुंबई-जालना 'वंदे भारत'ची गाईला धडक, इंजिन पडलं बंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 7:42 AM IST

Updated : Jan 14, 2024, 8:00 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vande Bharat Express Hit Cow : जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची गायीला धडक लागल्यानं इंजिन बंद पडल्याची घटना लासूर ते पोटुळ रेल्वे स्टेशन दरम्यान शनिवारी (13 जानेवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. तसंच जवळपास एक तास रेल्वे इंजिन दुरुस्त करण्यासाठी लागले. मागील दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वंदे भारत छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पडल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रवाशानं चालू गाडीत सिगारेट ओढल्यानं अलार्म वाजल गाडी बंद झाली होती. त्यामुळं बराच वेळ धावपळ उडाली होती.

गाय धडकेत गाडी झाली बंद : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ झाला. शनिवारी नियमित वेळेत रेल्वे संभाजीनगरकडे येत असताना लासूर ते पोटुळ रेल्वे स्टेशन दरम्यान अचानक गायमध्ये आल्यानं जोराची धडक बसली. या घटनेत रेल्वेचे ब्रेक पाईपसह इंजिनचे इतर नुकसान झाले. त्यामुळं रेल्वे रस्त्यात बंद पडली, इंजिन बंद पडल्यानं रेल्वे सुरू होण्यासाठी बराच काळ प्रयत्न करावा लागला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी आपल्या टीमला चालकाच्या मदतीसाठी पाठवले. त्यानंतर जवळपास एक तासानं इंजिन सुरू झालं. त्यानंतर रेल्वेचं इंजिन सुरू झाले. ही रेल्वे रात्री आठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर स्थानकावर पोहोचली.

सिगारेटच्या धुरानं गाडी पडली होती बंद : चार दिवसांपूर्वी रेल्वेत झालेल्या घटनेनं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. मुंबई येथून गाडी जालण्याकडं निघाली असताना नाशिक जवळ एका प्रवाशानं चालू गाडीत सिगारेट पेटवली. त्यामुळं झालेल्या धुरानं अलार्म वाजला. रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळं रस्त्यातच रेल्वे थांबवण्यात आली. बराच काळ काय झालं हे कोणालाच कळालं नाही. मात्र, प्रवासी भयभीत झाले होते. अखेर तपासानंतर एका प्रवाशाने चालू गाडीत सिगारेट पेटवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर रेल्वे पुन्हा मार्गस्थ झाली.

हेही वाचा -

  1. जालना ते मुंबई प्रवास आता फक्त सात तासांत पूर्ण, 'वंदे भारत ट्रेन'चं वेळापत्रक घ्या जाणून
  2. आधुनिक भारताच्या ट्रेनची जालन्यातून सुरूवात, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही - देवेंद्र फडणवीस
  3. Udaipur Jaipur Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस उलटवण्याचा प्रयत्न; ट्रॅकवर दगड अन् रॉड, पाहा व्हिडिओ

Last Updated : Jan 14, 2024, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.