ETV Bharat / state

Aurangabad Municipal Council : आगामी निवडणुका स्थगित होण्याची शक्यता; मराठवाड्यात 47 नगरपरिषदेत प्रशासकांची नेमणूक

author img

By

Published : Dec 28, 2021, 1:08 PM IST

औरंगाबाद, मराठवाड्याच्या विविध नगरपरिषदेमध्ये ( Marathwada Municipal Council ) होणाऱ्या निवडणूका पुढे ढकळण्याचे संकेत समोर आले आहेत. नगर विकास विभागाने मराठवाड्यातील 47 नगरपरिषदेत प्रशासक नेमणूक करत असल्याचे पत्र जारी केले आहे. या निर्णयाला कोविड-19 चे कारण दिले.

Aurangabad
औरंगाबाद

औरंगाबाद : सध्या जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम बऱ्याच गोष्टीवर झालेला आहे. तसेच आता याचा परिणाम निवडणूकांवर होताना दिसत आहे. नुकतेच नगर विकास विभागाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकात सांगण्यात आले आहे की, कोविड-19 च्या संक्रमणामुळे राज्यात सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया ( Aurangabad General election process )वेळेवर पार पाडणे शक्य झाले नाही.
त्याचबरोबर मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणुक आयोगाने ( State Election Commission ) कळवले आहे. त्यानुसार विभागातील संबंधित नगरपरिषद प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याच पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार प्रशासक नेमणूक करण्यास काढण्यात आलेल्या आदेशानुसार -

औरंगाबाद - कन्नड नगरपरिषद, पैठण नगरपरिषद, गंगापूर नगरपरिषद, खुलताबाद नगरपरिषद

जालना - जालना नगरपरिषद, अंबड नगरपरिषद, भोकरदन नगरपरिषद, परतूर नगरपरिषद

परभणी - गंगाखेड नगरपरिषद, जिंतूर नगरपरिषद, सेलू नगरपरिषद, मानवत नगरपरिषद, पाथरी नगरपरिषद, पुर्णा नगरपरिषद, सोनपेठ नगरपरिषद

हिंगोली - वसमत नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद, कळमनूरी नगरपरिषद

बीड - बीड नगरपरिषद, अंबेजोगाई नगरपरिषद, माजलगांव नगरपरिषद, परळी वैजनाथ नगरपरिषद, गेवराई नगरपरिषद, धारुर नगरपरिषद

नांदेड - अर्धापुर नगरपंचायत, माहूर नगरपंचायत, देगलूर नगरपरिषद, बिलोली नगरपरिषद, धर्माबाद नगरपरिषद,
हदगांव नगरपरिषद, कंधार नगरपरिषद, कुंडलवाडी नगरपरिषद, मुदखेड नगरपरिषद, मुखेड नगरपरिषद आणि उमरी नगरपरिषद

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगरपरिषद, भुम नगरपरिषद, कळंब नगरपरिषद, मुरूम नगरपरिषद, नळदुर्ग नगरपरिषद, उमरगा नगरपरिषद, परांडा नगरपरिषद आणि तुळजापूर नगरपरिषद

लातूर - उदगीर नगरपरिषद, अहमदपूर नगरपरिषद, औसा नगरपरिषद, निलंगा नगरपरिषद या ठिकाणी प्रशासक नेमणूक केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.