ETV Bharat / state

हुतात्म्यांचा स्पर्श झालेल्या मातीने साकारणार नकाशा, औरंगाबादेतील देशभक्ताचे अनोखे अभियान - aurangabad umesh jadhav news

एका देशभक्ताने अनोखे अभियान राबवले आहे. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत जवानांनी स्पर्श केलेली माती जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत नव्वद हुतात्म्यांच्या गावातून माती जमा केली आहे. श्रीनगर येथे जवानांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी या मातीतून देशाचा नकाशा साकारला जाणार आहे.

unique camapign by patriot
हुतात्मांच्या अंगणातील मातीतून साकारणार नकाशा
author img

By

Published : Nov 22, 2020, 9:12 AM IST

Updated : Nov 22, 2020, 1:29 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील एका देशभक्ताने अनोखे अभियान राबवले आहे. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत जवानांनी स्पर्श केलेली माती सोबत घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या अभियानात जवळपास लाखभर किलोमीटरचा प्रवास हा देशभक्त करणार आहे. उमेश जाधव असे या देशभक्ताने नाव आहे. उमेश मूळचे औरंगाबादचे असून सध्या ते बंगळुरू येथे संगीत शिकवत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या प्रति भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये बंगरुळुरूमधून आपला प्रवास सुरू केला.
दोन वर्षात एक लाख वीस किलोमीटरचा प्रवास
लष्कराच्या परवानगीने 1 एप्रिल 2019 रोजी बंगळुरू येथून प्रवास सुरू केला. आतापर्यंत 70 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 90 हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना भेट दिली. त्यांच्या अंगणातील माती सोबत घेतली. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यात प्रवास अर्धवट सोडावा लागला होता. आता हा प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यापुढे आणखी 40 ते 50 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून श्रीनगर येथे प्रवास संपणार आहे.

देशभक्ताचे अनोखे अभियान

प्रवासासाठी विशेष गाडी

मोठा पल्ला गाठत असताना लष्करात असलेल्या साधन सामग्रीचा वापर केला गेला. गाडीच्या समोरच्या बाजूला प्रतिकात्मक बंदूक आणि त्यासोबत भारताचा ध्वज लावण्यात आला. युद्धात सैनिकांशी संभाषण करण्यासाठी वापरण्यात येणारा फोन, वेगवेगळ्या रेजिमेंटचे लोगो लावण्यात आले आहेत. लष्कराच्या गाडीला लावण्यात येणारी कुऱ्हाड देखील गाडीला लावण्यात आली असून एका बाजूला या मोहिमेचा उद्देश लिहिण्यात आला आहे. त्याचबरोबर गाडीच्या मागे जुनी गाडी सुधारित करून जोडण्यात आली आहे. ज्यामध्ये सैनिकांच्या अंगणातील घेतलेली माती ठेवण्यात येत आहे.

हुतात्मांच्या अंगणातील मातीतून साकारणार नकाशा

हुतात्मा जवानांच्या प्रती सोशल मीडियावर मोहीम राबवल्या जातात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र या सैन्याची आठवण राहावी याकरिता काहीतरी करावं असा मानस होता. त्यातूनच प्रवास सुरू करण्यात आला आहे. या प्रवासात हुतात्म्यांच्या अंगणातील माती सोबत घेत आहे. आतापर्यंत नव्वद गावातून माती जमा केली आहे. श्रीनगर येथे जवानांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी या मातीतून देशाचा नकाशा साकारला जाणार आहे. जो नव्या पिढीला प्रेरणा देईल असा विश्वास उमेश जाधव यांनी व्यक्त केला. याआधी पुलवामा येथील हुतात्म्यांच्या अंगणातील माती सोबत घेऊन 14 फेब्रुवारीला लष्कराकडे दिली असल्याचे देखील उमेश जाधव यांनी सांगितलं.

देश हुतात्म्यांना लक्षात ठेवतो याचा कुटुंबियांना आनंद

देशासाठी हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना भेटत असताना वेगळा आनंददायी अनुभव येत असल्याचे उमेश यांनी संगितले. आपल्या कुटुंबातील मुलगा, पती, वडील गेल्याचे दुःख कुटुंबियांना आहेच. मात्र देश रक्षणासाठी ते कामी आले याचे समाधान कुटुंबियांना आहे. देशातील लोक हुतात्म्यांना विसरले नाहीत याचा आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया जवानांच्या कुटुंबीयांनी दिल्याची माहिती उमेश जाधव यांनी दिली. जवानांच्या घरी जात असताना काही दुर्गम भागात देखील जावे लागते. त्यावेळी सोबत असलेली गाडी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे दुर्गम भागात जाऊन हुतात्मा कुटुंबियांची भेट घेता यावी यासाठी सोबत असलेल्या गाडीत एक स्कुटी आणि सायकल सोबत घेऊन प्रवास करत असल्याचं उमेश जाधव यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रवास करत असताना अनेक वेळा सायकल वापरावी लागली. त्यामुळे वेगळा भारत पाहायला मिळाला त्याचा अनोखा अनुभव आल्याची भावना उमेश जाधव यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - कोरोना होऊ नये म्हणून रंगवले केस, छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील घटना

कोणत्याही राजकीय नेत्यांची मदत न घेता सुरू केला प्रवास
एक लाख वीस हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी पैसे जमवण्याचा चिंता होतीच. या उपक्रमासाठी काही राजकीय नेते आणि व्यावसायिक मदत करायला तयार होते. मात्र या लोकांची मदत न घेता हे अभियान पूर्ण करायचे अशी इच्छा होती. त्यामुळे मित्र परिवार आणि रस्त्यात मिळणारी मदत घेऊन हा प्रवास सुरू केला. 70 हजार किलोमीटरचा प्रवास करत असताना गाडीचे टायर आणि इंजिन खराब झाले. त्यावेळी अडचण आली, काही दिवस एकाच ठिकाणी थांबावे लागले. मात्र मदत मिळाली आणि प्रवास पुन्हा सुरू केला असा अनुभव उमेश जाधव यांनी सांगितला.

हेही वाचा - पुणे पदवीधरच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

Last Updated : Nov 22, 2020, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.