ETV Bharat / state

Gangapur Sugar Factory Elections : भाजपच्या बालेकिल्यात सेनेचा सुरुंग; आमदार प्रशांत बंब चितपट, उद्धव सेनेचा विजय - आमदार प्रशांत बंब

उद्धव सेनेने भाजपला गंगापूर मतदार संघात जोरदार झटका दिला आहे. गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत उद्धव सेनेचा विजय मिळवला असून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना चितपट केले आहे.

Gangapur Sugar Factory Elections
Gangapur Sugar Factory Elections
author img

By

Published : Feb 14, 2023, 10:56 PM IST

आमदार प्रशांत बंब चितपट, उद्धव सेनेचा विजय

औरंगाबाद : राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात येताच राजकीय समीकरण बदलेत. त्यात ताकदवान दाखवण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करताना दिसून येत आहेत. औरंगाबाद उद्धव ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदार संघ ताब्यात घेण्याचा दावा भाजपकडून केला जात होता. मात्र त्यापूर्वीच भाजप आमदार प्रशांत बंब याची ताकद असलेला गंगापूर मतदार संघात साखर कारखाना ताब्यात घेत शिवसेनेने गड आमचाच हे दाखवून दिले आहे.

कारखान्यावर उद्धव सेनेचा भगवा : राज्यात सत्ता हाती घेतल्यावर भाजपने औरंगाबाद जिल्ह्यात आपली ताकद वाढली असल्याचा दावा केला. 2024 मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, याच जिल्ह्यात भाजपचा हक्काचा गंगापूर मतदार संघात उद्धव सेनेने जोरदार झटका दिला. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना गंगापूर साखर कारखान्यात एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे खुद्द आमदार बंब यांना स्वतःला देखील निवडून आणता आल नाही. 15 वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर कारखाना निवडणुकीकडे तालुकासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांचे शिवशाही शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यामध्ये डोणगावकर यांच्या पॅनलने सर्व जागांवर चांगल्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामुळे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना चांगलाच झटका बसलाय.

असा रंगला सामना : भाजप आ. प्रशांत बंब यांनी शेतकरी सभासद कामगार पॅनेल विरोधात कृष्णा पाटील डोणगावकर यांचा शिवशाही शेतकरी विकास पॅनेल रिंगणात उतरवले. दोन्ही पॅनेलचे एकूण 40 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीनंतर शिवशाही शेतकरी विकास पॅनेचे 20 पैकी 20 उमेदवार निवडून आले. त्यात भजपला मोठा धक्का बसला. कारण त्यांचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय, एक कॅबिनेट मंत्री असून, खुद्द प्रशांत बंब 15 वर्षांपासून विद्यमान आमदार आहेत. गंगापूर कारखाना निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजपची वाट किती बिकट आहे, याची जाणीव उद्धव ठाकरे शिवसेनेने करून दिली.

त्यांनी शब्द पाळावा : मिळालेला विजय सर्वसामान्य शेतकरी आणि कामगार यांचा आहे. कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. तो दसऱ्यापर्यंत सुरू होईल. जोपर्यंत कारखाना सुरू होणार नाही तोपर्यंत, कुणाचेही स्वागत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे शिवसेनेचे विजयी पॅनलचे प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केली. तर, हा विजय शरद पवार यांच्या सानिध्यात वाढलेल्या भ्रष्टाचारी अनुयायांनी अफवा पसरवून मिळवला आहे. आता त्यांनी दसऱ्यापर्यंत कारखाना सुरू करून आपला शब्द पाळावा, अशी टीका पराभव झालेले भाजपचे प्रशांत बंब यांनी केली.

हेही वाचा - Bhiwandi Lok Sabha Constituency : शिंदे गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघात तयारी; शिंदे-भाजप येणार आमनेसामने?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.