ETV Bharat / state

औरंगाबादेत २ भामट्यांनी वृद्ध महिलेस लुटले - Sachin Jire

औरंगाबादेतील जालनारोड येथे मदत करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी एका वृद्ध महिलेस लुटले. पोलीस तपास करत आहेत.

वृद्ध महिलेशी बोलताना पोलीस
author img

By

Published : Jul 10, 2019, 2:21 PM IST

औरंगाबाद - दोन भामट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोने लुटल्याचा प्रकार आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जालनारोडवरील सेव्हनहिल उड्डाणपुला खाली घडला. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी लुटीचा प्रकार घडल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनुसयाबाई शिंदे (वय ५८ वर्षे, रा.सिंदोन-भिंदोन) असे महिलेचे नाव आहे.

जिन्सी पोलीस ठाणे

शिंदे या औरंगाबाद मधील पिसादेवी भागात राहणाऱ्या नातेवाईकडे आल्या होत्या. त्यांना पिसादेवीकडे जाणाऱ्या रिक्षाची माहिती नसल्याने त्या उड्डाणपुला खाली थांबल्या होत्या. दरम्यान २ अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले व रस्त्याच्या पलीकडे पिसादेवीकडे जाणारी रिक्षा थांबते, आम्ही तुम्हाला रस्ता ओलांडायला मदत करतो, अशी थाप मारली. उड्डाणपुलाखाली येताच दोघांनी महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दोघेही पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांनी पथकासह घटनस्थळी धाव घेतली. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुपारपर्यंत महिलेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Intro:दोन भामटयानी वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोने लुटल्याचा प्रकार आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जलनारोडवरील सेव्हनहिल उड्डाणपुला खाली घडला. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी लुटीचा प्रकार घडल्याने सर्वसंन्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अनुसयाबाई शिंदे वय 58 ( रा.सिंदोन-भिंदोन) असे महिलेचे नाव आहे.

Body:शिंदे या औरंगाबाद मधील पिसादेवी भागात राहणाऱ्या नातेवाईकडे आल्या होत्या .त्यांना पिसादेवी कडे जाणाऱ्या रिक्षाची माहिती नसल्याने त्या उड्डाणपुला खाली थांबल्या होत्या. दरम्यान दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले व रस्त्याच्या पलीकडे पिसादेवी कडे जाणारी रिक्षा थांबते तुम्हा रस्ता ओलांडून देतो अशी थाप मारली व उड्डाणपुलाखाली येताच दोघांनी महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड करे पर्यंत दोघेही पसार झाले होते.घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांनी पथकासह घटनस्थळी धाव घेतली.पोलीस परिसरातील सीसीटीव्ही च्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुपार पर्यंत महिलेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.