औरंगाबाद - शहरात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळून ( Omicron Patients in Aurangabad ) आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
इंग्लडमधून आलेले प्रवासी पॉझिटीव्ह -
ओमीक्रॉन बाधित असलेली युवती इंग्लंडहून प्रवास करून मुंबईत दाखल झाली होती. पुण्याला कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी 21 वर्ष ही तरुणी कुटुंबियांसह आली होती. मात्र विमानतळावर तिची तपासणी केली असता तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र तिचे वडील, आई आणि बहीण हे निगेटिव्ह असल्याने त्यांना सोडण्यात आले होते. औरंगाबादला आल्यावर आई आणि बहीण एका खाजगी हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात राहत होत्या. तर वडील मुंबईलाच मुलीच्या उपचारासाठी थांबले होते. दरम्यान वडील, बायको आणि मुलीची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद शहरात दाखल झाल्यावर त्यांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ते कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यांचा स्वॅब पुण्याला पाठवण्यात आला असता त्यांचा अहवाल ओमीक्रॉन पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुबईहून आलेला युवक पॉझिटीव्ह -
सिडको येथील दुबईहून ( Dubai ) आलेला 33 वर्षीय युवकाचा शहरात येताच कोरोना बाधित असल्याचे समोर आलं होतं. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा स्वब पुण्याला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटीव्ह आला. हा युवक खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेला. त्यानंतर त्याचा अहवाल आल्याने त्याला पुन्हा विलगीकरण कक्षात हलवणार आहे.