औरंगाबाद - औरंगाबाद-बीड हायवे रोड लगत असलेल्या गांधीली शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील नुरानी मस्जीदजवळ राहणारे अतिक अकील शेख (वय 19), नदीम नाशेर शेख (वय 17) हे दोघे पोहण्यासाठी बीड बायपास गांधीली शिवारात गेले. दोघांनी पोहण्यासाठी तलावात उडी मारली. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले.
दरम्यान, घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ रुग्णवाहिका बोलून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे गारखेडा परिसरात शोककळा पसरली होती.
हेही वाचा - 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार अंशतः लॉकडाऊन; रात्रीची संचारबंदीही कायम
हेही वाचा - कारतूस भरलेल्या पिस्तुलासह दोन जण अटकेत, विशेष पथकाची कारवाई