ETV Bharat / state

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर संभाजीनगरचे बॅनर लावणाऱ्या दोघांना अटक - sachin jire

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे नाव पेंटने पुसून त्या ठिकाणी संभाजीनगर, असा बॅनर लावून तेढ निर्माण करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे.

संभाजीनगरचे स्टीकर लावताना
author img

By

Published : Jul 1, 2019, 2:03 PM IST

औरंगाबाद - रेल्वे स्थानकावरील फलकावर असलेल्या औरंगाबाद नावाला पेंटने रंगवून त्याठिकाणी संभाजीनगर, असे स्टिकर लावण्यात आले होते. यामुळे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एमआयएम कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. याप्रकरर्णी औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर संभाजीनगरचे स्टीकर लावताना

नितीन रामराव निर्मळ (वय - ३४ वर्षे, द्वारकनगर, एन ११), रुद्राक्ष गणपत वाकुडे (वय २५ वर्षे, रा.पुंडलीकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तर पंकज दहिवाल (रा.मुंबई) हा पळून गेला आहे.

रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नितीन, रुद्राक्ष, पंकज आणि एक सहकारी, असे चौघेजण औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आले. चौघांनी स्थानकावरील औरंगाबाद शहराचे नाम दर्शविणाऱ्या फलकावर पिवळ्या रंगाचे पेंट टाकून नामफलकावर खाडाखोड केली. त्यानंतर सोबत आणलेल्या संभाजीनगर लिखित बॅनर त्या नामफलकावर चटकविण्यात आले. त्यानंतर या मंडळींनी फोटो आणि व्हिडिओ शूट करून पोबारा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने रेल्वेस्थानक गाठून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. संतप्त घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घातल्याने प्रकरण निवळले.

या प्रकरणी चार जणांविरोधात तेढ निर्माण करणे व रेल्वेच्या नामफलकावर खाडाखोड करणे, विना परवानगी प्रवेश करणे इत्यादी कलमाखाली रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय पवार यांनी तातडीने सूत्रे हालवीत नितीन निर्मळ आणि रुद्राक्ष वाकुडे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पंकज दहिवाल हा पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे तिघेही कोणत्याही पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते नाहीत, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

Intro:रेल्वे स्थानकावरील फलकावर असलेल्या औरंगाबाद नावाला पेंटने रंगवून त्याठिकाणी संभाजीनगर असे स्टिकर लावल्याने मद्यरात्री 12 च्या सुमारास औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एमआयएम कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.यावप्रकरर्णी औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.
नितीन रामराव निर्मळ वय-34 (द्वारकनगर, एन-11),रुद्राक्ष गणपत वाकुडे वय-25 (रा.पुंडलीकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तर पंकज दहिवाल (रा.मुंबई) हा फरार आहे.

Body:रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नितीन रुद्राक्ष, पंकज आणि एक सहकारी असे चौघेजण औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आले व चौघांनी स्थानकावरील औरंगाबाद शहराचे नाम दर्शविणाऱ्या नामफलकावर पिवळ्या रंगाचे पेंट टाकून नामफलकावर खाडाखोड केली व त्यानंतर सोबत आणलेल्या संभाजिंनगर लिखित बॅनर त्या नामफलकावर डकविण्यात आले. व त्यानंतर या मंडळींनी फोटो व्हिडिओ शूट करून पोबारा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी मोठ्यासंख्येने रेल्वेस्थानक गाठले व घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संतप्त घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घातली त्या नंतर प्रकरण निवळले.या प्रकरणी चार जना विरोधात तेढ निर्माण करणे व रेल्वेच्या नामफलकावर खाडाखोड करणे ,विना परवानगी प्रवेश करणे इत्यादी कलमाखाली रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नंतर औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत,उपनिरीक्षक विजय पवार यांनी तातडीने सूत्र हलवीत नितीन निर्मळ आणि रुद्राक्ष वाकुडे या दोन्ही आरोपिना अटक केली आहे तर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच पंकज दहिवाल हा पसार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे तिघेही कुठल्याही पक्ष संघटने चे कार्यकर्ते नाही असे पोलीसानी स्पष्ट केले आहे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.