ETV Bharat / state

विजेच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

इंगळे वस्ती परिसरातील हायवामधील मुरूम रिकामा करीत असताना वरून गेलेल्या ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.

author img

By

Published : May 3, 2019, 10:11 AM IST

विजेच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद - ट्रकमध्ये (हायवा) भरलेला मुरुम रिकामा करीत असताना ३३ के.व्ही.च्या तारेला ट्रकचा स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी वैजापुरातील इंगळे वस्ती येथे घडली. भानुदास रंगनाथ इंगळे (वय ४५ रा. वैजापूर) असे मृत चालकाचे नाव आहे.

इंगळे वस्ती परिसरातील गट क्रमांक २०७ मध्ये इंगळे हे (एम एच २० ए.टी. ४६७८) या हायवामधील मुरूम रिकामा करीत असताना वरून गेलेल्या ३३ के.व्ही.च्या विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला. ट्रकचा वायरला स्पर्श होताच ट्रकचे टायर फुटले, त्यानंतर ट्रकने पोट घेतला. टायर फुटल्याच्या आवाजाने नागरिकांनी ट्रककडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत भानुदास इंगळे यांचा मृत्यू झाला होता.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वीजवितरण विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. भानुदास इंगळे यांच्या मृत्यू प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:.

भरलेला मुरम रिकामा करीत असताना 33 के.व्ही.च्या तारेला हायवाचा स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी वैजापुरातील इंगळे वस्ती येथे घडली.
भानुदास रंगनाथ इंगळे (वय-45 रा.वैजापूर) असे मृत चालकाचे नाव आहे.
Body:इंगळे वस्ती परिसरातील गट क्रमांक207 मध्ये इंगळे हे (एम एच 20 ए टी 4678) या हायवामधील मुरूम रिकामा करीत असताना वरून गेलेल्या 33 के.व्ही च्या विजेच्या तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाला .आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.स्पर्श होताच हायवाचे टायर फुटले आणि त्यांनी पेट घेतला.टायर फुटल्याच्या आवाजाने नागरिकांनी धाव घेतली. मात्र तो पर्यंत इंगळे यांचा मृत्यू झाला होता. परिसरात सर्वत्र विजेचे खांब वाकलेले आजेत.त्यावरील ताराही लोम्बकळत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विजवितरण विभागाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.इंगळे यांच्या मृत्यू प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.