औरंगाबाद- कन्नड तालुक्यात कालपासून रिमझिम पाऊस चालू आहे. अशात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 चे काम सुरू आहे. यासाठी वापरण्यात येणारी माती ही महामार्गावर जमा होती, ती पावसामुळे ओली झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून वाहतूक खोळंबली आहे.
महामार्गावर चिखल झाल्याने नागरिकांना आपली वाहने चालविण्यात समस्या होत आहे. महामार्गाचे काम सातकुंड पर्यंत असल्याने सातकुंड तांडा ते कन्नड पर्यंत काल (सोमवार) रात्री 8 वाजेपासून आज सकाळी पर्यंत महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले असून यात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
पावसाची मंडळ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे
कन्नड 5 मिलीमीटर सरासरी 123 मिलीमीटर, चापानेर 30 मिलीमीटर सरासरी 109 मिलीमीटर, देवगाव रंगारी 16 मिलीमीटर सरासरी 153 मिलीमीटर, चिकलठान 7 मिलीमीटर सरासरी 70 मिलीमीटर, पिशोर 25 मिलीमीटर सरासरी 129 मिलीमीटर, नाचनवेल 39 मिलीमीटर सरासरी 142 मिलीमीटर, करंजखेड़ा 2 मिलीमीटर सरासरी 138 मिलीमीटर, चिंचोली लिम्बाजी 11 मिलीमीटर तर सरासरी 164 मिलीमीटर तर आज सकाळ पर्यंत 16.87 मिलिमीटर तर सरासरी तालुक्यात आतापर्यंत 129.5 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे. अशी मंडळ निहाय विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.