ETV Bharat / state

Ajanta Caves: अजिंठा लेणीवर पर्यटकांना मिळेना प्यायला पाणी; बील थकवल्याची माहिती समोर - अजिंठा लेणी प्रशासनाकडून पाणी बील थकले

देशात अजिंठा लेणी सर्वांच्या मनाला भुरळ घालणार असं पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी लेणी परिसरात भेट देत असतात. (Ajanta Caves) मात्र मागील गेल्या काही वर्षात पिण्याचे पाणीच उपलब्ध होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर नकारात्मकता पसरत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 10, 2022, 3:33 PM IST

औरंगाबाद - अजिंठा येथील लेणी पर्यटकांच्या पसंतीस उतरते. गेल्या काही वर्षात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटक नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे आता परिसरात पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून पाण्याचे पैसे दिले नसल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Ajanta Caves administration exhausted water bills) जवळपास तीन कोटी रुपयांची थकीत बाकी देणे असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. परिणामी आलेल्या पर्यटकांना पिण्यास पाणी उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे बाटलीबंद पाणी विकत घेण्यासाठी लेणी परिसरात खाली उतरावे लागते. त्यामुळे अनेक पर्यटकांना त्रास सोसावा लागत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.

व्हिडिओ

हॉटेल व्यवसाय वापरतात कुंडातील पाणी अजिंठा लेणी परिसरात हॉटेल व्यवसायिक आपला व्यवसाय करत असतात. मात्र त्यावेळेस देखील पाण्याची नितांत गरज असते. आलेल्या ग्राहकांना पाणी देणे आवश्यक असते. मात्र लेणी परिसरातच पाणी उपलब्ध नसल्याने, पायथ्याशी असलेल्या कुंडातील पाण्याचा वापर करण्यात येथे. कुंडातील पाणी फिल्टर करून स्वच्छ केले जाते आणि ते पर्यटकांना दिल जाते. मात्र हॉटेल देखील लेणीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे लेणी पाहण्यासाठी वर गेलेल्या पर्यटकांना पाणी मिळत नाही.

पर्यटनमंत्र्यांनी दौरा करत घेतला होता आढावा - अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठ्याचे देयक देण्याची जबाबदारी राज्य पुरातत्त्व विभागाकडे असते. मात्र गेल्या काही वर्षात पाण्याचे देयक अदा करण्यात आलेले नाही. परिणामी कोट्यावधींची थकबाकी झाली आहे. यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे पाणीपुरवठा विभागाने अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र देयक मिळत नसल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे लेणी परिसरात आले होते. त्यावेळेस त्यांनी सर्व बाबतीत आढावा घेतला आणि लवकरच असलेली समस्या दूर होईल असा आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही परिणामी जगात प्रसिद्धीस असलेल्या लेणीत पर्यटकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे.

रस्त्यात पिण्याचे पाणी उपलब्ध असावे - अजिंठा लेणी परिसरात 29 लेण्या पर्यटकांना पाहायला मिळतात. जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर विस्तारलेल्या लेणी पाहण्यासाठी पाच ते सहा तास लागत असतात. त्यावेळी एका पर्यटकाला एक ते दोन लिटर पाणी गरजेचं असते, मात्र तेवढे पाणी घेऊन जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून रस्त्यात पिण्याचे पाणी उपलब्ध असावे अशी गरज असते. मात्र तसं होत नसल्याने बरेच पर्यटक काही वेळ लेणी पाहून परतीचा मार्ग स्वीकारतात. लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून पार्किंग आणि देखभाल दुरुस्तीसाठी कर आकारला जातो. त्याच माध्यमातून पाण्याचे देयक देणे अपेक्षित असतं. तसे होत नसल्याने पर्यटकांना हाल सहन करावे लागत आहेत. अस मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंह यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.