औरंगाबाद - जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी 200 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 125 पुरूष, 75 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6 हजार 243 कोरोनाबाधित आढळले असून 2 हजार 969 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 279 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 142 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात 58 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सतत वाढणारी रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. वाढती रुग्णसंख्येसोबत मृतांची वाढती संख्याही डोकेदुखी ठरत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
औरंगाबादमध्ये सलग आठव्या दिवशी कोरोनाचे दोनशेहून अधिक नवे रुग्ण - औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
औरंगाबाद जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी 200 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये 125 पुरूष, 75 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6 हजार 243 कोरोनाबाधित आढळले असून 2 हजार 969 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.