पैठण (औरंगाबाद) - तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव शिवारात काल (दि. 2 मे) रात्रीच्या सुमारास माजी उपसरपंच कांता शिंदे याचा शेतीच्या वादातून व जुन्या भांडणातून खून झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (दि. 3मे) सकाळी उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासांतच खुनचा छडा लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अनिल उर्फ पप्पु अशोक केदारे (वय 21 वर्षे), संजय मनोहर केदारे (वय 26 वर्षे), राजेश प्रभाकर केदारे (वय 23 वर्षे, सर्व रा. गाढेगांव, ता. पैठण, जि. औरंगाबाद), या तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. सुरुवातीला तिघांनीही उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिघांची वेग-वेगळी चौकशी करण्यात आली त्यावेळी अनिल केदारे म्हणाला, त्याने त्याचे चुलतभाऊ संजय केदारे व राजेश केदारे ,असे तिघांनी मिळून कांता श्रीपती शिंदे यांना काल (दि. 2 मे) रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हसोबा पुलाजवळ ब्रम्हगव्हाण पंप हाऊस रोडवर लिंबाच्या झाडाच्या बाजूला गाढेगांव शिवारात त्यास पट्ट्याने, लाकडाने व लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचा खून केला, असे कबूल केले.
हेही वाचा - जायकवाडी धरणात 49 टक्के पाणीसाठा