ETV Bharat / state

कृषी विभागाची जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई; तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित - सिल्लोड लेटेस्ट न्यूज

जिल्हा आणि तालुका कृषी विभागाच्या सयुंक्त पथकाने जादा दराने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना रंगेहाथ पकडले. यामुळे तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले.

Agro service center licence cancelled
तीन कृषी सेवा केंद्रचे परवाने निलंबित
author img

By

Published : Jun 3, 2020, 5:19 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद)- रासायनिक खतांची जादा दराने विक्री करणाऱ्या तीन कृषी सेवा केंद्र चालकांना बनावट ग्राहक पाठवून जिल्हा व तालुका कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी 12 वाजता औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.

अरिहंत कृषी सेवा केंद्र, आदिनाथ कृषी सेवा केंद्र व यश कृषी सेवा केंद्र, अशी परवाना निलंबित करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांची नावे आहेत. तीन कृषी सेवा केंद्र चालकांना रंगेहाथ पकडताच दर्शना कृषी सेवा केंद्र, श्रीनाथ ऍग्रो एजन्सी, गुळवे ऍग्रो एजन्सीच्या चालकांनी काढता पाय घेत धूम ठोकली. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चिंतामणी कृषी सेवा केंद्र चालकाला खत विक्री बंद ठेवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत, असे दीपक गवळी यांनी सांगितले.

घाटनांद्रा येथील काही कृषी सेवा केंद्र चालक बियाणे व खते जादा दराने विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी जिल्हा व तालुका कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने सापळा लावत बनावट ग्राहक पाठवून केंद्र चालकांना रंगेहाथ पकडले.

औरंगाबादचे तंत्रधिकारी विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक प्रशांत पवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी धम्मशीला भडीकर, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तालुक्यात मुबलक प्रमाणात खतांचा साठा आहे. तरी देखील कृत्रिम टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री केल्यास परवाने निलंबित करण्यात येतील, असा इशारा दीपक गवळी यांनी दिला आहे. जादा दराने खत विकणाऱ्यांची तक्रार तालुका कृषी कार्यालयात करावी. तक्रार देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.