ETV Bharat / state

देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा : दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधून थांबवली रेल्वे; महिलांच्या दागिन्यांसह इतर साहित्य लुटले

author img

By

Published : Apr 22, 2022, 8:36 AM IST

Updated : Apr 22, 2022, 12:16 PM IST

9 ते 10 जणांच्या टोळीने रेल्वेवर तुफान दगडफेक करत प्रवाशांचे मोबाइल, पर्स, काही महिलांचे दागिने लुटून नेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोटूळ स्थानक
पोटूळ स्थानक

औरंगाबाद - पोटूळ येथील रेल्वेस्थानकाजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकला. 9 ते 10 जणांच्या टोळीने रेल्वेवर तुफान दगडफेक करत प्रवाशांचे मोबाइल, पर्स, काही महिलांचे दागिने लुटून नेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Raut Vs Fadnavis : फडणवीसांना सुबुद्धी सुचली असती तर आज ते कदाचित मुख्यमंत्री राहिले असते-संजय राऊत

सिग्नल वर कपडा बांधून थांबवली रेल्वे - सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर पोटूळ स्थानकाजवळ पोहोचताच चालकाला तेथील सिग्नल बंद दिसले. दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधला होता. त्यांनी स्टेशन मास्तरला कळवले. तोपर्यंत रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाली. डब्यांमध्ये 9 ते 10 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाइल, पर्स आणि इतर साहित्य हिसकावले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही घटना कळली नाही. जवळपास 6 ते 7 डब्यांमध्ये त्यांनी लूटमारीचा प्रयत्न केला आणि नंतर पळ काढला. अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. तिथे पोलिस चौकशीला सुरुवात झाली असून याबाबत दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट देण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Last Updated : Apr 22, 2022, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.