पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्यानंतर आणि त्यात मशिदीवरील भोंग्यांच्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण हे चांगलच तापलं आहे. औरंगाबाद येथील सभा आणि त्यांनतर अक्षय तृतीयाला सामूहिक आरतीच्या वेळी मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 2 हजार वकिलांची फौज नेमण्यात आली आहे. ही टीम मनसैनिकांना संरक्षण देणार आहे.
मनसैनिकांना देणार संरक्षण - महाराष्ट्र नवनिर्माण वकील संघटनेच्या माध्यमातून 2 हजार वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. या टिमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जर मनसैनिकांना संरक्षण देण्यात येणार आहे. कुठेही जर मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला तर तात्काळ त्याला मदत मिळावी, या उद्देशाने ही टीम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती कायदेशीर टीमचे प्रमुख किशोर शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा - राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.