ETV Bharat / state

औरंगाबाद : गोळ्या-बिस्कीट व्यापाऱ्यांची पावणेचार लाखाची बॅग लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद - गोळ्या-बिस्कीट व्यापाऱ्यांची पावणेचार लाखाची बॅग लंपास

गोळ्या-बिस्कीटाच्या मालाचे पैसे घेऊन जात असलेल्या टेम्पोतून दुचाकीस्वारांनी पावणेचार लाखांची रोकड लांबवली. बॅग लांबविणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याआधारे दोघांचा शोध सुरु आहे.

Aurangabad chori
Aurangabad chori
author img

By

Published : Oct 30, 2021, 2:46 AM IST

औरंगाबाद - गोळ्या-बिस्कीटाच्या मालाचे पैसे घेऊन जात असलेल्या टेम्पोतून दुचाकीस्वारांनी पावणेचार लाखांची रोकड लांबवली. ही घटना गुरुवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास मोंढा नाका ते जाफरगेट रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपावर घडली. बॅग लांबविणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याआधारे दोघांचा शोध सुरु आहे.

पडेगावात गोळ्या-बिस्कीटचा कारखाना असलेले मालक जिन्स ज्ञानराज नाडार यांच्याकडे सलोमन सॅमसन गायकवाड (४५, रा. अमीन चौक, भावसिंगपुरा) व मुजीब जुल्फेकार सय्यद असे दोघे कामाला आहेत. गुरुवारी सायंकाळी गोळ्या-बिस्कीटांचा माल विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेली रक्कम बॅगेत ठेऊन दोघेही टेम्पोतून (एमएच-२६-एडी-६५३१) तीन लाख ६३ हजारांची रोकड घेऊन जात होते. रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास हे दोघेही मोंढा नाका ते जाफरगेट रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपावर टेम्पोत डिझेल भरण्यासाठी थांबले. याचदरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या टेम्पोतील पैशाची बॅग लांबवली. हा प्रकार घडल्यानंतर गायकवाड आणि मुजीब यांनी घटनेची माहिती दोन तासानंतर मालक नाडार यांना कळवली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाडार यांच्यासह गायकवाड व मुजीब यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हे ही वाचा - अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी -

पैशाची बॅग चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यावर जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक अनंत तांगडे, गोकुळ ठाकुर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथील सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक ठाकुर करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.