गंगापूर ( औरंगाबाद) गंगापूर कृषी अत्पन्न बाजर समितीमधील तीन आडत दुकाने फोडून 33 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाऊस एग्रो या दुकानातून 28 हजार रु. योगेश ट्रेडरमधून 3 हजार रु. लक्ष्मी ट्रेंडिंगमधून 2 हजार 500 रु. चोरट्यांनी लंपास केले आहेत. सागर नावदंर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
चोरी झाल्याने दुकांदारामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बाजार समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्ट्रिट लाईट बसवण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत दुकाने बंद ठेवणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.