ETV Bharat / state

औरंगाबादेत मुस्लिमांना 'जय श्रीराम' म्हणायला लावले, आठवड्यातील दुसरी घटना

आझाद चौकात झोमॅटोची डिलीव्हरी करणाऱ्या दोन तरुणांना जय श्रीरामचा जप करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे

जय श्रीरामचे नारे देण्यासाठी तरूणास भाग पाडले
author img

By

Published : Jul 22, 2019, 8:10 AM IST

Updated : Jul 22, 2019, 1:43 PM IST

औरंगाबाद - शहरातील आझाद चौकात काल (रविवारी) झोमॅटोची डिलीव्हरी करणाऱ्या मुस्लिम तरुणाला जय श्रीरामचा बोलण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'जय श्रीराम' म्हणण्यासाठी तरुणांना भाग पाडले, औरंगाबादेत आठवड्यातील दुसरी घटना

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी करणारे दोन मुस्लीम तरुण दुचाकीवरून जात असताना त्यांना एका पांढऱ्या कारमधील चार जणांनी अडविले. यांनतर त्यांच्याकडून बळजबरीने 'जय श्रीराम'चे नारे वधवून घेतले. या घटनेनंतर शहरातील आझाद चौकात मोठा जमाव जमला होता व वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रण मिळवले.

तरुणाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यातील ही शहरातील दुसरी घटना आहे. या दोन घटनेमुळे शहरातील सामाजिक वातावरण गढुळ झाल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चार जणांचा शोध घेत आहे. आरोपींविरूद्ध एफआयआर नोंदविला गेला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांनी दिली.

Intro:Body:

Maharashtra: Two youth were allegedly forced to chant 'Jai Shri Ram' by four unidentified persons at Azad Chowk in Aurangabad, yesterday. Chiranjeevi Prasad, Police Commissioner says,"we have registered an FIR & we will investigate the matter impartially."

Aurangabad ब्रेकिंग

झोमॅटो डिलीव्हरी बॉय ना थांबवत जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले

आझाद चौकातील घटना..

सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

आरोपी सीसीटीव्हीत कैद

घटनेनंतर आझाद चौकात तणाव निर्माण झाला होता.

आठवड्यातील दुसरी घटना

Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.