छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रतापनगर उस्मानपुरा येथील काजी अब्दुल वाजिद अब्दुल यांची मुलगी शहाजान काझी हिचा विवाह आरोपी अझहर खान याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र त्यांच्यात नेहमीच कौटुंबिक वाद समोर येऊ लागले. त्यामुळे काजी अब्दुल कुटुंबीयांकडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत संभाजीनगर जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयात त्याबाबत प्रकरण दाखल झाले. न्यायालयाने काही तारखा दिल्या आहेत, त्यानुसार तारखेला हजर राहण्यासाठी आरोपी अझरखान अफजल खान कौटुंबिक न्यायालयात आला होता.
न्यायालयात जबाब झाल्यानंतर बाहेर आल्यावर त्याला राग अनावर झाला त्याने, सासरा काझी अब्दुल वाजीद अब्दुल आणि पत्नी शहाजहान यांच्यावर कारने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात दोघं बाल बाल बचावले. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर तो बाहेर आला तेव्हा त्याची पत्नी आणि सासरे त्याला समोर दिसले त्याने कार काढून सरळ कार त्यांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोघांनी सतर्कता दाखवत बाजूला झाले आणि त्यामुळे ते थोडक्यात वाचले.
हा प्रकार झाल्या नंतर मात्र सासरे अंगावर कार घालणाऱ्या जावायाला पकडण्यासाठी धावले, तो पर्यंत तो पुढे निघून गेला होता. सासऱ्याने त्याची कार गाठत कारच्या खिडकीत हात घातला. त्यावर जावयाने धारदार वस्तूने त्यांची बोटे कापली, ही झटापट ईतक्या वेगात झाली की यात एका बोटाचे दोन तुकडे झाल्याचे समोर आले आहे. ही घटना कौटुंबिक न्यायालयात समोर घडली. याप्रकरणी जावई अझहर खान अफजल खान पठाण यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अजहर खान यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर, सासरा काझी अब्दुल त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. तेव्हा न्यायालयाच्या जवळील सिग्नल वर त्याची गाडी थांबलेली होती. सासऱ्याने कारच्या खिडकीत हात घालत त्याला पकडले. मात्र त्याच वेळी अजहर खानने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या बोटावर वार केला. त्यात त्यांची दोन बोटे कापली गेली, एका बुटाचे दोन तुकडे पडले. त्यानंतर आरोपीने कारसह पळ काढला, काजी अब्दुल वाजिद यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शास्त्रक्रिया करून उपचार झाल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, वेदांत नगर पोलीस ठाण्यात अजहर खान अफजल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Akola Crime News: आई बाबाजवळ राहत नाही; रागातून मुलीने आईच्या चेहऱ्यावर फेकले चिकटद्रव्य