औरंगाबाद - लसीकरणाच्या टक्केवारीत जिल्हा मागे पडला होता. मात्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन नियम लागू करून लसीकरणाची सक्ती केली. आणि त्याचा परिणाम दिसून आला. जवळपास 8 टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Aurangabad Vaccination ) यांनी लसीकरण बाबत आढावा घेताना विशेषतः ऐतिहासिक शहर म्हणून औरंगाबादच्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी लसीकरणाचे शहर अशी ओळख निर्माण झाली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या मानाने कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन नियमावली लावण्याचे निर्देश दिले.
नव्या नियमांचा धाक बसल्याने वाढले लसीकरण -
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत निसार ज्याचं लसीकरणाची टक्केवारी 75 टक्क्यांपर्यंत पोचले होते. मात्र औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लसीकरणाची टक्केवारी खूप कमी होती. 32 लाख 24 हजार नागरिकांची उद्दिष्ट असताना, पहिली लस 18 लाख म्हणजे 56% तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अवघी साडेसात लाख मध्ये 23 टक्के इतकी होती. ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या आणि त्यामध्ये नागरिकांना लसीकरण याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. जिथे दिवसाला 12 ते 13 हजार नागरिकांचे लसीकरण रोज होत होते. तिथे 65 हजारांपर्यंत रोजचे लसीकरण सुरू झाले. त्यानुसार पहिली लस देणाऱ्या नागरिकांची 22 लाख 86 हजार 198 इतकी म्हणजे 70.90 टक्क्यांपर्यंत तर दुसरी लाच घेणाऱ्या नागरिकांची संख्या 9 लाख 84 हजार 135 म्हणजे 30.53 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
...असे लावले आहेत नवीन नियम -
- पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी लसीकरण अनिवार्य केले. त्याच बरोबर पर्यटनस्थळी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
- लसीकरण नसलेल्या नागरिकांना रेशन धान्य मिळणार नाही असे नियम लावण्यात आले. त्यामुळे झोपडपट्टीत किंवा स्लम भागात लस न घेणाऱ्या नागरिकांना लस घेण्यासाठी पुढे यावे लागले.
- इंधन ही रोज लागणारी अत्यावश्यक बाब, त्यामुळे लसीकरण नसलेल्या नागरिकांना पेट्रोल देण्यास मनाई करण्यात आले, इतकेच नाही तर पेट्रोल पंप चालकांना तसे बंधनकारक करण्यात आले, नियम न पाळणाऱ्या पपं चालकांवर कारवाई केली.
- पेट्रोल पपंवर येणाऱ्या नागरिकांना लसीकरण सक्तीचे केले, लस न घेतलेल्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र पेट्रोल पपंवर सुरू केले.
- लसीकरण जनजागृती साठी उपाय योजना केल्या, मुस्लिम वस्तीत लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने मुस्लिम धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती केली, किराडपुरा येथील मस्जिदीत लसीकरण केंद्र सुरू केले.
- सोमवार पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे, लस न घेतलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे.