ETV Bharat / state

पावसाळा लांबणार, महिनाभर चारा छावण्या सुरू ठेवाव्या लागतील - महसूलमंत्री - चंद्रकांत पाटील

या वर्षीचा मान्सून लांबण्याची चिन्हे असल्याने अजून एक महिना तरी चारा छावणी सुरू ठेवावी लागणार, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत केले आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jun 2, 2019, 12:23 PM IST

औरंगाबाद - या वर्षीचा मान्सून लांबण्याची चिन्हे असल्याने अजून एक महिना तरी चारा छावणी सुरू ठेवावी लागणार, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. चारा छावणी चालकांना तत्काळ त्यांचे राहिलेले सर्व पैसे देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच त्यांचे देय रक्कम शून्यावर आणून ठेवा, अशा देखील सूचना देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या करमाड येथील चारा छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कुठल्याही अडचणी येणार नाही असे त्यांनी सांगितले.

चारा छावणी चालकांच्या अनेक तक्रारी होत्या, त्यानुसार अनेक बदल करण्यात आले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नव्याने चारा छावणी सुरू करण्यासाठी लागणारे डिपॉजीट कमी केले असून प्रत्येक चारा छावणीला यापुढे पाणी सरकारकडून पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने अजून महिनाभर तरी चारा छावण्या सुरू ठेवाव्या लागणार असल्याची शक्यता वर्तवली. शेळ्या आणि मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याच्या परवाणग्या दिल्या आहेत. मात्र, त्यासाठी संस्था पुढे यायला हवे, असे देखील पाटील म्हणाले. काही ठिकाणी चारा छावणीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचे आरोप होत असून त्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यांचे वेतन देखील थांबवण्यात येणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितले.

Intro:या वर्षीचा मान्सून लांबण्याची चिन्हे असल्याने अजून एक महिना तरी चारा छावणी सुरु ठेवावी लागणार असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. चारा छावणी चालकांना तात्काळ त्यांचे राहिलेले सर्व पैसे देण्याचे आदेश सरकारने दिलेली आहेत. किंबहुना त्यांचे देय रक्कम शून्यावर आणून ठेवा अशा देखील सूचना देण्यात आल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं.

Body:चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादच्या करमाड येथील चारा छावणीला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांना कर्जदेण्यास कुठल्याही अडचणी येणार नाही असं त्यांनी सांगितलं.

Conclusion:चारा छावणी चालकांच्या अनेक तक्रारी होत्या, त्यानुसार अनेक बदल करण्यात आले असल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं. नव्याने चारा छावणी सुरू करण्यासाठी लागणारे डिपॉसीट कमी केले असून प्रत्येक चारा छावणीला यापुढे पाणी सरकार पुरवणार आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने अजून महिनाभर तरी चारा छावण्या सुरू ठेवाव्या लागणार असल्याची शक्यता वर्तवली. शेळ्या आणि मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याच्या परवानग्या दिल्या आहेत मात्र त्यासाठी संस्था पुढे यायला हव्यात अस देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. काही ठिकाणी चारा छावणीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचे आरोप होत असून त्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यांचं वेतन देखील थांबवण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.