ETV Bharat / state

अखेर दहावीच्या 'त्या' विद्यार्थिनिला मिळाला न्याय, खुद्द विधानसभा अध्यक्षांनी मांडला होता ठिय्या

दहावीची उत्तर पत्रिका फाडल्याने अंजली गवळी या विद्यार्थिनीचा निकाल राखीव ठेवला होता. अखेर या विद्यार्थिनीला न्याय मिळाला आहे. या प्रकरणात अंजली निर्दोष आढळल्याने तिचा निकाल लावण्यात आला असून, तिला 72.60 टक्के गुण मिळाले आहेत.

अखेर दहावीच्या 'त्या' विद्यार्थीनिला मिळाला न्याय
author img

By

Published : Jul 18, 2019, 10:15 AM IST

औरंगाबाद - दहावीची उत्तर पत्रिका फाडल्याने अंजली गवळी या विद्यार्थिनीचा निकाल राखीव ठेवला होता. अखेर या विद्यार्थिनीला न्याय मिळाला आहे. या प्रकरणात अंजली निर्दोष आढळल्याने तिचा निकाल लावण्यात आला असून, तिला 72.60 टक्के गुण मिळाले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी अंजली गवळीसाठी शिक्षण मंडळात ३ तास ठिय्या केला होता. त्यानंतर मुंबईत शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली होती. चौकशी केली असता, पर्यवेक्षकाचा हलगर्जीपणा दिसून आल्याने अंजलीचा निकाल लावण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत पांढरी पिंपळगाव येथे राहणाऱ्या अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थिनीने हिंदीची उत्तर पत्रिका फाडल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अंजलीला पुढच्या ३ परिक्षांसाठी रेस्टिकेट करण्यात आले होते. मात्र, मी उत्तर पत्रिका फाडलीच नाही असे अंजलीने बोर्डाला सांगितले. तरीही बोर्डाने केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अंजलीने थेट विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे धाव घेतली होता.

अखेर दहावीच्या 'त्या' विद्यार्थीनिला मिळाला न्याय

त्यानंतर हरीभाऊ बागडे यांनी बोर्डात येऊन जाब विचारला होता. उत्तर मिळत नसल्याने बागडे यांनी ३ तास ठिय्या देखील मांडला होता. बोर्डाने नियमांवर बोट ठेवल्याने बागडे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी तातडीची बैठक घेऊन सर्वच प्रलंबित प्रकरणाची चौकशी करून निकाल लावण्याचे आदेश दिले होते. अंजली गवळी प्रकरणी चौकशी पूर्ण करण्यात आली. चौकशीत अंजली निर्दोष आढळल्याने तिचा निकाल लावण्यात आला असून, अंजलीला दहावीत 72.60 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, इतर विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:दहावीची उत्तर पत्रिका फडल्याने निकाल राखीव ठेवलेल्या अंजली गवळी या विद्यार्थिनीला न्याय मिळाला, चौकशी निर्दोष आढळून आल्याने अंजलीला निकाल लावण्यात आला असून तिला 72.60 टक्के गुण मिळाले आहेत. Body:विधानसभा अध्यक्षांनी अंजली गवळी साठी शिक्षण मंडळात तीन तास ठिय्या केला होता. त्यानंतर मुंबईत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर चौकशी केली असता पर्यवेक्षकाचा हलगर्जीपणा दिसून आल्याने अंजलीचा निकाल लावण्यात आला.Conclusion:माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत पांढरी पिंपळगाव येथे राहणाऱ्या अंजली भाऊसाहेब गवळी या विद्यार्थिनीने हिंदीच्या उत्तर पत्रिका फडल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली. अंजलीला तीन परीक्षांसाठी रेस्टिकेट करण्यात आले. मात्र मी उत्तर पत्रिका फडलीच नाही असं अंजलीने बोर्डाला दिले. मात्र बोर्डाने केलेली कारवाई योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे अंजलीने थेट विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे धाव घेतली. बागडे यांनी बोर्डात येऊन जाब विचारला, उत्तर मिळत नसल्याने हरीभाऊ बागडे यांनी तीन तास ठिय्या देखील मांडला. बोर्डाने नियमांवर बोट ठेवल्याने बागडे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी तातडीची बैठक घेऊन सर्वच प्रलंबित प्रकरणाची चौकशी करून निकाल लावण्याचे आदेश दिले. अंजली गवळी प्रकरणी चौकशी पूर्ण करण्यात आली. चौकशीत अंजली निर्दोष आढळल्याने तिचा निकाल लावण्यात आला असून अंजलीला दहावीत 72.60 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र इतर विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.