ETV Bharat / state

KCR Lok Sabha Contest : बीआरएसची महाराष्ट्रावर स्वारी; मराठवाड्यातून केसीआर लढवणार लोकसभा निवडणूक - KCR Loksabha in maharashtra

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते स्वतः लोकसभा निवडणूक मराठवाड्यातून लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सर्व विधानसभा मतदार संघात चाचपणी सुरू झाल्याची माहिती बीआरएस पक्षाचे किसान आघाडी प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिली.

BRS
BRS
author img

By

Published : May 25, 2023, 6:13 PM IST

Updated : May 25, 2023, 6:34 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने राज्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते स्वतः लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात लढवतील असे संकेत मिळत आहेत.

विशेषतः मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा निवडणूक बीआरएस पक्ष स्वतः लढवेल असेही सांगण्यात येत आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सर्व विधानसभा मतदार संघात चाचपणी सुरू झाल्याची आहे. - माणिक कदम, बीआरएस पक्षाचे किसान आघाडी प्रदेशाध्यक्ष

राज्यात सभांचा सपाटा : बीआरएस पक्षाने नांदेड येथे पहिली जाहीर सभा घेत राज्यात आपल्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठे शक्ती प्रदर्शन त्यांनी केले. राज्यातील सर्व विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत बीआरएस पक्षाने दिले आहेत. शहरात त्यांनी जाहीर सभेसाठी केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वत्र गुलाबी झेंड्याची चर्चा पाहायला मिळाली होती. इतकंच नाही तर काही संघटनांना सोबत घेण्याबाबत आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करून ही निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

कार्यकर्ते कामाला लागले : छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात मिळालेला प्रतिसाद पाहता, हे मतदारसंघ पक्ष वाढीसाठी उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक स्वतः पक्षाचे अध्यक्ष लढवतील असे संकेत देण्यात आले. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आले आहे.

अनेक पक्षातील स्थानिक नेते पक्षात : गेल्या चार महिन्यांपासून राज्यात बीआरएस पक्ष काय रणनीती आखणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र या काळात अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात निमंत्रण देऊन पक्षप्रवेश देण्यात आला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अब्दुल कदीर मौलाना, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, गांगापुरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील किमान चार विधानसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवेल याची खात्री झाली. मात्र त्यानंतर नुसतं जिल्ह्यात नाही तर, राज्यातील सर्वच मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात आली.

लोकसभा निवडणूक चंद्रशेखरराव लढवणार : त्यासाठी इतर पक्षांच्या तोडीस तोड उमेदवार हेरण्याचे काम पक्ष करत आहे. आता लोकसभा निवडणुका बाबत तयारी सुरू करण्यात आली असून राज्यातील निवडणूक सर्व ताकतीनशी लढण्याचा निर्धार बीआरएस पक्षाने केला आहे. इतकच नाही तर, मराठवाड्यातील नांदेड किंवा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक स्वतः पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव लढतील असे संकेत देण्यात आले आहे. त्याबाबत चाचणी सुरू असल्याची माहिती पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीची चुरस वाढणार असल्याचे चित्र उभे होत आहे.

हेही वाचा -

  1. HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
  2. PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
  3. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; आता एनआयए करणार जयेश पुजारीचा तपास

Last Updated : May 25, 2023, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.