ETV Bharat / state

तलाठ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील सपकाळ वाडी येथील वाल्मिक ऋषी मंदिर जवळील विहिरीमध्ये एकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांनी पहिले . विहिरीजवळ तलाठी राहुल पांडे यांची मोटारसायकल (क्र. महा. 20 एफडी 0779) दिसून आल्याने सदर मृतदेह हा तलाठी राहुल पांडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

Rahul pande
मृत राहुल पांडे
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:00 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) - तालुक्यातील अन्वी सजाचे तलाठी राहुल पांडे यांचा मृतदेह शहरातील सपकाळ वाडी परिसरातील विहिरीमध्ये आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील सपकाळ वाडी येथील वाल्मिक ऋषी मंदिर जवळील विहिरीमध्ये एकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांनी पाहिले . विहिरीजवळ तलाठी राहुल पांडे यांची मोटारसायकल (क्र. महा. 20 एफडी 0779) दिसून आल्याने सदर मृतदेह हा तलाठी राहुल पांडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच, सिल्लोड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पांडे यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. तो उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

राहुल पांडे यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सर्वांना परिचित असलेल्या तरुण वयाच्या तलाठी राहुल पांडे यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.