ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये विवाहितेच्या हत्येचा संशय; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार - married women

आंबेडकरनगरमध्ये एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू नसून सासर मंडळींच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

औरंगाबाद
author img

By

Published : May 8, 2019, 3:21 PM IST

औरंगाबाद - आंबेडकरनगरमध्ये एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू नसून सासर मंडळींच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घाटी रुग्णालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शाहीन सय्यद रईस सय्यद (वय 25 आंबेडकरनगर,औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

औरंगाबाद
मृत शाहीन हिला मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने तिला सासरच्या मंडळींनी रुग्णालयात हलविले होते. दरम्यान रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मात्र, शाहीनच्या अंगावर मारहाणीचे वळ आहेत. तिला सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोपी मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वी देखील शाहीनला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण झाली होती. तेव्हा सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी घरघुती भांडण समजून प्रकरण मिटविले होते. त्यांनी त्याच वेळेस कारवाई केली असती, तर आज शाहीनचा मृत्यू झाला नसता, असा आरोप नातेवाईकांनी केला. शिवाय हातात मागील तक्रारीची प्रत घेऊन ते घाटीत दाखल झाले आहेत.

हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या प्रकरणी सध्या सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल,अशी माहिती उपनिरीक्षक पी.जी.अबूज यांनी दिली आहे.

dsdd
मृत शाहीन

Intro:

मंडळीच्या मारहाणीत 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपिना अटक करा अशी मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घाटी रुग्णालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सय्यद शाहीन रईस सय्यद वय-25 (आंबेडकरनगर,औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

Body:मृत शाहीन हिला मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने तिला सासरच्या मंडळींनी रुग्णालयात हलविले होते.दरम्यान तिचा मृत्यू झाला.मात्र शाहीन च्या अंगावर मारहाणीचे वळ आहेत तिला सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला असा आरोपी मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.यापूर्वी देखील शाहीन ला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण झाली होती.तेंव्हा सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.परंतु पोलिसांनी घरघुती भांडण समजून प्रकरण मिटविले होते त्यांनी त्याच वेळेस कारवाई केली असती तर आज शाहीन चा मृत्यू झालं नसत असा आरोप नातेवाईकांनी केला शिवाय हातात मागील तक्रारीची कॉपी घेऊन ते घाटीत दाखल झाले आहे.जो पर्यंत हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवकांनी घेतला आहे.या प्रकरणी सध्या सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे.शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल.अशी माहिती उपनिरीक्षक पी.जी.अबुज यांनी दिली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.