ETV Bharat / state

औरंगाबाद : म्यूकरमायकोसिसवरील औषधींचा वेळेवर पुरवठा करावा; बाधितांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - mucormycosis patients medicine aurangabad

गेल्या काही दिवासांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली ही समाधानकारक बाब असली तरी म्यूकोरमायकोसिस बाधितांची संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.

supply medicines to mucormycosis patients demand by relatives
बाधितांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
author img

By

Published : Jun 18, 2021, 7:31 AM IST

Updated : Jun 18, 2021, 9:51 AM IST

औरंंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, तरी दुसरीकडे म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील रुग्णांना लागणारे औषध रुग्णालयात मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत घेतली. या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना करण्यात आली.

बाधितांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

रुग्णालयाचे प्रशासनाकडे बोट -

गेल्या काही दिवासांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली ही समाधानकारक बाब असली तरी म्यूकोरमायकोसिस बाधितांची संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी औषध का मिळत नाही, विचारणा केली असता खासगी रुग्णालयात औषध नसल्याचे कारण सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले जात आहे.

हेही वाचा - 'डेल्टा व्हेरिएंट’ वर प्रभावी असा बूस्टर शॉट 'स्पूटनिक व्ही' आणणार

रुग्णाच्या नातेवाईकांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय -

म्यूकरमायकोसिस बाधित ५० रूग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. यावेळी 50 रुग्णांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.

Last Updated : Jun 18, 2021, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.