ETV Bharat / state

राज्यमंत्री अतुल सावे यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क - maharashtra assembly polls

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून राज्यभरामध्ये सुरुवात झाली. सकाळी ७ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

राज्यमंत्री अतुल सावे कुटुंबियांसह
author img

By

Published : Oct 21, 2019, 12:39 PM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून राज्यभरामध्ये सुरुवात झाली. सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

राज्यमंत्री अतुल सावे यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क

सकाळी ७ वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, यांच्यासह काँग्रेसचे कल्याण काळे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

सकाळीच मतदान केल्याने दिवसभर मतदान केंद्रावर नागरिकांच्या भेटीगाठी घेता याव्यात, अशी लवकर मतदान करण्यामागे नेत्यांची भावना असते. सकाळी ७ वाजता राज्यमंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे जाऊन आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. विकासकामे केल्याने नागरिकांचा जनाधार मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री सावे यांनी व्यक्त केला, तर मतदान आपला हक्क असून तो सर्वांनी बजावावा, असे आवाहन सावे यांच्या कुटुंबीयांनी केले. यावेळी अतुल सावे आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळ पासून सुरुवात झाली. सकाळी सात ते आठ या एकतासात जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

Body:सकाळी सात वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, यांच्यासह काँग्रेसचे कल्याण काळे, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या कुटुंबायांसोबत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

Conclusion:सकाळीच मतदान केल्याने दिवसभर मतदान केंद्रावर विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी व्हाव्यात यासाठी वेळ मिळतो अशी भावना असते. सकाळी सातच्या ठोक्यावर राज्यमंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे जाऊन आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केलं. विकास काम केल्याने नागरिकांचा जनाधार मिळेल असा विश्वास राज्यमंत्री सावे यांनी व्यक्त केला तर मतदान आपला हक्क आहे. सर्वांनी तो बजवावा अस आवाहन सावे यांच्या कुटुंबीयांनी केलं. अतुल सावे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.