ETV Bharat / state

'राज्यातील ६ कारागृह लॉकडाऊन, कारागृह पोलिसांसाठी विशेष व्यवस्था'

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत सविस्तर महत्त्वाची चर्चा करून लोकप्रतिनिधी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

'राज्यातील ६ कारागृह लॉकडाऊन, कारागृह पोलिसांसाठी विशेष व्यवस्था'
author img

By

Published : Apr 19, 2020, 4:57 PM IST

औरंगाबाद - आजपासून राज्यातील सहा कारागृह लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेले कारागृह लॉकडाऊन असणार आहेत. कारागृहातील पोलीस तेथेच राहणार असून नव्याने पोलीस किंवा कैदी आत जाणार नाही किंवा बाहेर येणार नाहीत, असेही देशमुख यांनी औरंगाबादेत सांगितले.

औरंगाबादेत तबलिगी जमातचे 102 लोक आले. त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. त्यातील ज्या लोकांनी ट्रॅव्हल व्हिसाचा गैरवापर केला अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर सुरू असलेले कोरोनाचे उपचार पूर्ण झाल्यावर जवळपास 156 लोकांवर कारवाई होईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्गाबाबत हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला. औरंगाबाद जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत सविस्तर महत्त्वाची चर्चा करुन लोकप्रतिनिधी यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. त्यानुसार महत्त्वाच्या काही सूचना दिल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रात बाहेरच्या विद्यार्थ्यांना आणि परप्रांतियांना सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली. त्यावेळी सर्वत्र राज्यबंदी असल्याने काही मुख्यमंत्र्यांनी कोणालाही बाहेर राज्यातून येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते शक्य नाही. मात्र, त्याबाबत बोलणी सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. रमजानच्या अनुषंगाने कोणतेही सण जाहीररित्या साजरे न करण्याचा सूचना आहेत. त्यामुळे अनेक मौलवींनी तसा फतवा काढला आहे असेही देशमुख यांनी सांगितले. कोणी सामाजिक तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. बुलडाण्याचा एक जवान शहीद झाला असून त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.