ETV Bharat / state

संतापजनक! मानलेल्या भावाने केला बहिणीवर अत्याचार - औरंगाबाद न्यूज

जगभरात भाऊ आणि बहिणीचं नातं हे विश्वासाचं मानलं जातं. औरंगाबादमध्ये मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मानलेल्या भावाने बहिणीवर अत्याचार केला.

औरंगाबाद
अत्याचार
author img

By

Published : Sep 4, 2021, 8:50 AM IST

औरंगाबाद - आईवडिलांचे छत्र हरविलेल्या 15 वर्षीय मुलीवर मानलेल्या भावानेच आत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा (25) असे आरोपीचे नाव आहे.

पीडिता आणि आणि बहिणी शहरात राहतात. पीडितेची मोठी बहिण ही आरोग्य क्षेत्रात नोकरी करते. त्यांच्या आईचे निधन 11 वर्षापूर्वी तर वडिलांचे निधन 4 वर्षांपूर्वी झाले. प्रसाद नामक व्यक्तीला दोघींनी आपला भाऊ मानलं होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी त्याला राखीही बांधली. यानंतर तो पीडितेला आपल्यासोबत व्यायाम करण्यासाठी घेऊन गेला. मात्र, मैदानावर जाण्याचा रस्ता बदलत त्याने मित्राच्या कारने बायपासला रेल्वे पटरीच्या पलीकडे असलेल्या त्याच्या खोलीवर गेले. तिथे तिला व्यायाम करायला लावला आणि मालिश करतो म्हणत तिच्यावर अत्याचार केला. सदरचा प्रकार कोणास सांगीतल्यास चित्रकरण केले असून ते व्हायरल करेल, अशी धमकी दिली.

त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कोठेही याची वाच्यता केली नाही. मात्र, दोन दिवसांनी त्रास होऊ लागल्यानंतर मोठ्या बहिणी तिला रुग्णालयात घेऊन गेली. तेव्हा हा प्रकार समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिल्यानंतर समाजसेविका सुकन्या भोसले यांनी पीडितेला धीर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

आरोपी मुंबईहून तडीपार -

पीडीतेला जो मुलगा खरोखर बहिण मानत होता. आरोपी हा त्याचा मित्र आहे. त्यामुळे पीडितेकडून त्याने बहिण मानून राखी बांधून घेतली होती. आरोपी प्रसाद याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला मुंबईहून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणीही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : जालियानवाला बाग हत्याकांड नेमकं का घडलं, जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.