ETV Bharat / state

मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला दे धक्का...सिल्लोड, सोयगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात - minister abdul sattar

सर्वांचे लक्ष लागलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत नऊ विरूद्ध सात मतांनी शिवसेनेने सत्ता काबीज केली. तर, सोयगाव पंचायत समितीमध्ये चार विरूद्ध दोन मतांनी शिवसेनेकडे कायम ठेवली.

sillod
सिल्लोड आणि सोयगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात
author img

By

Published : Jan 1, 2020, 10:55 AM IST

Updated : Jan 1, 2020, 11:39 AM IST

औरंगाबाद - शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागताच सिल्लोड मतदारसंघात त्यांनी भाजपला पहिला धक्का दिला. सिल्लोड पंचायत समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना अब्दुल सत्तार यांनी आपली चुणूक दाखवत भाजपच्या ताब्यात असलेली सिल्लोड पंचायत समिती शिवसेनेकडे ओढून आणली.

मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला दे धक्का...सिल्लोड, सोयगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात

हेही वाचा - औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची वर्णी

सर्वांचे लक्ष लागलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत नऊ विरूद्ध सात मतांनी शिवसेनेने सत्ता काबीज केली. तर, सोयगाव पंचायत समितीमध्ये चार विरूद्ध दोन मतांनी शिवसेनेकडे कायम ठेवली. सिल्लोड पंचायत समितीमध्ये आमठाणा गणाच्या कल्पना संजय जामकर सभापती तर, भराडी गणाचे काकासाहेब काशीनाथ राकडे यांची उपसभापती पदी निवड झाली. सोयगाव पंचायत समितीमध्ये फरदापूर गणाच्या रस्तूलबी पठाण यांची सभापती तर, बनोटी गणाचे साहेबराव गायकवाड यांची उपसभापती पदी निवड झाली.

minister abdul sattar
मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला दे धक्का...

मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणूक जिंकताच स्थानिक स्वराज संस्था शिवसेनेकडे खेचून आणण्यासाठी रणनिती आखली होती. या दरम्यान भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विश्वासावर शिवसेनेसोबत जोडले होते. पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काकासाहेब राकडे व कल्पना संजय जामकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. याचे फलित म्हणून भाजपच्या ताब्यात असलेली सिल्लोड पंचायत समिती ही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

निवडीची घोषणा होताच पंचायत समिती आवारामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. राज्यमंत्री पदी निवडीनंतर अब्दुल सत्तार यांचे पंचायत समिती आवारात आगमन होताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. शिवसेना व अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीने शहरात जल्लोष रॅलीचे स्वरूप आले होते. पंचायत समिती कार्यालय ते शिवसेना भवन या मार्गाने ही रॅली मार्गस्थ झाली. शिवसेना भवन येथे नवनिर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सभापती कल्पना जामकर, काकासाहेब राकडे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, युवानेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार, आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सिल्लोड पंचायत समिती निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राजेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. कल्पना जामकर व काकासाहेब राकडे यांना स्वतः सह प्रत्येकी नऊ सदस्यांची हात उंचावून मतदान केले. यामध्ये कल्पना जामकर , काकासाहेब राकडे यांच्यासह सय्यद सत्तार बागवान, कासाबाई गवळे, शेख सलीम, अजराबी पठाण,अली चाऊस, सरिता चव्हाण, आसिफ देशमुख यांनी शिवसेनेकडून मतदान केले.

Intro:ना. अब्दुल सत्तार यांचा भाजपला दे धक्का

सिल्लोड आणि सोयगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात

सिल्लोड ( प्रतिनिधी ) , आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागताच सिल्लोड मतदार संघात त्यांनी भाजपाला पहिला धक्का दिला. सिल्लोड पंचायत समिती मध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत असतांना अब्दुल सत्तार यांनी आपली चुणूक दाखवीत भाजपच्या ताब्यात असलेली सिल्लोड पंचायत समिती शिवसेनेकडे ओढून आणली.सर्वांचे लक्ष लागून असलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत 9 विरुद्ध सात मतांनी शिवसेनेने सत्ता काबीज केली. तर सोयगाव पंचायत समिती मध्ये 4 विरुद्ध 2 मातांनी शिवसेनेकडे कायम ठेवली. सिल्लोड पंचायत समिती मध्ये आमठाणा गणाच्या कल्पना संजय जामकर सभापती तर भराडी गणाचे काकासाहेब काशीनाथ राकडे यांची उपसभापती पदी निवड झाली. सोयगाव पंचायत समिती मध्ये फरदापुर गणाच्या रस्तूलबी पठाण यांची सभापती तर बनोटी गणाचे साहेबराव गायकवाड यांची उपसभापती पदी निवड झाली.Body: ना. अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणूक जिंकतात स्थानिक स्वराज संस्था शिवसेनेकडे खेचून आणण्यासाठी रणनीती आखली होती. या दरम्यान भाजपचे अनेक लोक प्रतिनिधी आमदार अब्दुल सत्तार यांच्या विश्वासावर शिवसेने सोबत जोडले गेले होते. पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुक तोंडावर काकासाहेब राकडे व कल्पना संजय जामकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. याचे फलित म्हणून भाजपच्या ताब्यात असलेली सिल्लोड पंचायत समिती ना. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

निवडीची घोषणा होताच पंचायत समिती आवारामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. राज्यमंत्री पदी निवडीनंतर अब्दुल सत्तार यांचे पंचायत समिती आवारात आगमन होताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगणिक झाला. शिवसेना व अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीने शहरात जल्लोष रॅलीचे स्वरूप आले होते. पंचायत समिती कार्यालय ते शिवसेना भवन या मार्गाने ही रॅली मार्गस्थ झाली. शिवसेना भवन येथे नवनिर्वाचित राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सभापती कल्पना जामकर, काकासाहेब राकडे यांचे स्वागत करण्यात आले.Conclusion:यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, युवानेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार, आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सिल्लोड पंचायत समिती निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राजेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न झाली. कल्पना जामकर व काकासाहेब राकडे यांना स्वतः सह प्रत्येकी नऊ सदस्यांची हात उंचावून मतदान केले. यामध्ये कल्पना जामकर , काकासाहेब राकडे यांच्यासह सय्यद सत्तार बागवान, कासाबाई गवळे, शेख सलीम, अजराबी पठाण,अली चाऊस, सरिता चव्हाण,आसिफ देशमुख यांनी शिवसेनेकडून मतदान केले.
Last Updated : Jan 1, 2020, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.