ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवा वगळता उघडली दुकाने .. कन्नडमध्ये 6 दुकानांवर गुन्हा दाखल

काही दुकानदारांनी अत्यावश्य सेवेत नसलेली दुकाने उघडली. या दुकानदारांवर साथ प्रतिबंध कायद्याप्रमाणे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

author img

By

Published : May 7, 2020, 10:56 AM IST

shops-opened-except-for-essential-services-case-file-in-aurnagabad

औरंगाबाद- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवल्याबद्ल शहरातील सहा दुकानांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारांनी अत्यावश्य सेवा वगळता दुकाने उघडू नयेत, अन्यता कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- पालिका कर्मचारी फक्त २४ तास क्वारंटाईन; तातडीने कामावर येण्याचा फतवा

लॉकडॉऊनच्या काळात किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, फळे, कृषी, दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत, तर मेडीकल व दवाखाने या अत्यावश्यक सेवा दिवसभर सुरू ठेवण्यास प्रशासनाने सूट दिली आहे. या व्यतीरिक्त इतर कोणतेही दूकान सुरू ठेवू नये, असे आदेश आहेत. मात्र, काही दुकानदारांनी अत्यावश्य सेवेत नसलेली दुकाने उघडली. या दुकानदारांवर साथ प्रतिबंध कायद्याप्रमाणे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी कन्नड शहर पोलिसांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग येथील पाणपोई व भाबरवाडी चाळीसगाव घाटाजवळ चेक पोस्ट तयार केली आहेत. विना परवाना कोणी कन्नड येथे बाहेर जिल्ह्यातून आल्यास त्याच्यावर देवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत 7 जणांवर गुन्ह्या दाखल झाला आहे.

कन्नड तालुक्यात प्रशासनाने राबविलेल्या यंत्रणा व नागरिकाचा संतर्कतेमुळे तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. भाजी मार्केट (मंडी) ही एका क्रीडा संकुलनात भरवण्यात आली आहे. तर तालुक्यात दोन मजुरांचे कॅम्प कार्यान्वीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर काम करण्यासाठी एका बांधकाम कंपनीने कॅम्प उभारला असून, त्यात परराज्यातील 303, तर कल्याण टोल कंस्ट्रक्शन कंपनीचा कॅम्पमधे 57 मजूर राहत आहेत. या मजुरांचे दोन निवारा केंद्रे आहेत.

यातील जवळपास 250 मजुरांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. त्यांना घरी जाण्यसाठी कायदेशीर परवानगी देण्याची कारवाई सुरू आहे. परराज्यात तालुक्यातील 299, तर परजिल्ह्यातील 380 मजूर अडकलेले आहेत. तालुक्यात पोलिसांची नजर चुकवून पायी जाणाऱ्या मजुरांची व्यवस्था व्हावी म्हणून प्रशासनाने चार ठिकाणी शाळा, महाविद्यालयांची इमारत अधिग्रहित केली आहे. तेथे तात्पुरते मजूर केंद्र उभारले आहे. त्याठिकानी जवळपास 1 हजार मजुरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था तहसील प्रशासनाने केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.