ETV Bharat / state

नामांतरणाबाबत पक्षाने घेतलेली भूमिका मान्य - अब्दुल सत्तार - औरंगाबाद संभाजीनगर विषय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे, ती मान्य असून लवकरच महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांची चर्चा करून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

पुणे
पुणे
author img

By

Published : Jan 10, 2021, 5:15 PM IST

पुणे - सध्या राज्यात औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय जोर धरत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असताना आत्ता औरंगाबादचे आमदार, राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे, ती मान्य असून लवकरच महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांची चर्चा करून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. पुण्यातील कोंढवा येथे एका कार्यक्रमाला आले असताना त्यावेळी ते बोलत होते.

पुणे

ही परंपरा भाजपनेच सुरू केली

नेत्यांची सुरक्षा काढण्याची परंपरा ही भाजपनेच सुरू केली आहे. देशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांची सुरक्षा भाजपनेच कमी केली आहे. राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची पूर्ण सुरक्षा काढली नसून ती कमी केली आहे, असे मत यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी कुराण आणि गीता वाचावी म्हणजे त्यांना समजेल कि यात काय लिहिले आहे. पाटील यांना झोपेत कुणी आदेश देतात कि काय ते बघावे लागणार आहे. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती भविष्यात घडणार नाही, असेही यावेळी सत्तार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.