ETV Bharat / state

खासदार खैरे आणि दानवेंमधील वाद पेटला, सेनेनं घेतली आढावा बैठक

भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांच्या जावयांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून दिल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

author img

By

Published : May 4, 2019, 9:40 PM IST

खासदार खैरे आणि दानवेंमधील वाद पेटला, सेनेनं घेतली आढावा बैठक

औरंगाबाद - भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांच्या जावयांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून दिल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या या आरोपामुळे युतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक फैऱ्या झाडल्या जात आहेत. त्यामुळे आता युतीच्या नेत्यांचा वाद चांगलाच पेटणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला उत्तर म्हणून भाजप नगरसेवकाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या प्रतिक्रियेवर खैरे यांनी संताप व्यक्त करत योग्यवेळी उत्तर देण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद टोकाला जाण्याची भीती आहे.

खासदार खैरे आणि दानवेंमधील वाद पेटला, सेनेनं घेतली आढावा बैठक

औरंगाबादचे खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावई आणि औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून घेतल्याचा आरोप केला आहे. सासऱ्याने जावयाला रसद पुरवली असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तर एकदा ही रक्कम पकडली तर ती सोडवुन घेतली, असेही ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे.

भाजप नगरसेवकांनी युती धर्म पाळला नाही, त्याचे पुरावे आमच्याकडे आल्यावर आम्ही ते देऊ, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. त्याबरोबर या विषयाला घेऊन शिवसेनेने आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

Intro:औरंगाबादेत सध्या सेने भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपप्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केल्याने युतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. खासदार खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी जावयाचे पोलिसांनी पकडलेले पन्नास लाख सोडवून घेतल्याचा आरोप केलाय. त्यामुळे युतीच्या नेत्यांचा वाद चांगलाच पेटणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. Body:चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला उत्तर म्हणून भाजप नगरसेवकाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिल. त्याप्रतिक्रीयेवर खैरे यांनी संताप व्यक्त करत योग्यवेळी उत्तर देईल असं सांगितलं. त्यामुळे आगामी काळात वाद टोकाला जाण्याची भीती आहे. Conclusion:औरंगाबादचे खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावाई आणि औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून घेतल्याचा आरोप केला. सासर्याने जावयाला रसद पुरवली त्यापैकी एकदा पकडले गेले मात्र त्यांनी ते सोडवून घेतले. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. भाजप नगरसेवकांनी युती धर्म पाळला नाही त्याचे पुरावे आमच्याकडे आल्यावर आम्ही ते देऊ. असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर याच विषयाला घेऊन शिवसेनेची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केला. आता शिवसेना दुष्काळी मदतीला लागणार असल्याचं देखील खैरे यांनी सांगितलं.

BYTE - चंद्रकांत खैरे - शिवसेना नेते

VO2 - खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपावर भाजप महापालिकेचे गटनेते प्रमोद राठोड यांनी खुलासा केला. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी युतीचंच काम केलं असून खैरे साहेबाना गैरसमज झाला असावा अन्यथा कोणाच्यातरी सांगण्यावरून आरोप करत असल्याच प्रमोद राठोड यांनी स्पष्ट केलं.

BYTE - प्रमोद राठोड - महानगर पालिका भाजप गटनेता

VO3 - भाजपच्या वतीने स्पष्टीकरण आल्यावर खासदार खैरे यांनी संताप व्यक्त करत वेळ आल्यावर उत्तर देऊ असं स्पष्टीकरण दिल. मात्र चंद्रकांत खैरे यांच्या विधानानंतर आता उलटसुलट चर्चाना सुरुवात झाली आहे. पराभव दिसत असल्याने खैरे आधीच कारण शोधात आहे का? अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. निकाल काही लागो मात्र युतीच्या नेत्यांमधील शाब्दिक वाद वाढण्याची शक्यता निर्मण झाली हे नक्की.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.