छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद): धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी अधिक प्रोत्साहन देत आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज या घटकांबाबत जाहीर बोललो. आज त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे, असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते.
मतदारांचा भाजपविरोधात ट्रेण्ड: कर्नाटक राज्यातील निकाल पाहता भाजप विरोधी निकाल आहे. बहुतांश राज्यात सत्ता भाजपची नाही. मोजक्या राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. हे चित्र कायम राहील तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बदल घडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या होतील. आता झालेल्या निवडणुकीत निकाल पाहता एकत्रित अस वाटत नाही. सरकारने जर न्याय दिला नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल त्यावेळी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. राज्यकर्त्यांचे लक्ष पायाभूत सुविधांकडे अधिक असायला हवे.
मतदार राजा बदल घडवतो22 व 23 जुनला विरोधकांची पाटण्यात बैठक- 22 व 23 जुनला विरोधकांची पाटण्यात बैठक होणार आहे. मतभेद असले तरी एकत्र येऊन पर्याय देण्याचे काम विरोधकांनी करावे. कोणाच्याही हातात रिमोट राहू द्या विरोधक एकत्र आले पाहिजे. नेतृत्व कोणाकडे राहू द्या. लोकांनी निर्णय घेण्याचा निर्णय घेतल्यास बदल होतो. मतदार राजा बदल घडवतो.
विरोधकांना मदत करणे अयोग्य 1977 आणि 2023 देशातील परिस्थिती सारखी आहे. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. प्रत्येक दोन सदस्यांनी बैठकीत भाग घेतला. त्यात आता जागा वाटप बाबत चर्चा होईल. चार जागा लढवताना दहा जागा मागतात. मात्र शेवटी चार जागा दिल्या जातात. ताकद पाहून जागा दिल्या जातील. पायात पाय घालून पाडणे व विरोधकांना मदत करणे अयोग्य असल्याचा सल्ला त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिला. नितीन गडकरी हे पक्ष न पाहता काम करतात. त्यांचे काम रिझल्ट देणार आहे, असे शरद पवारांनी कौतुक केले. भाजपच्या नेत्यांनी एकेरी भाषेत टीका केली होती. त्यावर बोलताना पवारांनी त्यांना कशाला महत्त्व देता, असे बोलून विषय संपविला आहे.
हेही वाचा-