औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 74 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 824 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) -
एन सहा, सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1), शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1). समोर आलेले कोरोनाबाधित रुग्ण या भागांतील आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा एका वृद्ध रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 21 वर पोहचली आहे. जुना बाजार येथील 75 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला 5 दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनाशिवाय त्यांना फुफ्फुसाचा निमोनिया झाला असल्याने रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.