औरंगाबाद: राज्यपालांना (chandrakant khaire on koshyari) म्हातारचळ लागले आहेत. महाराष्ट्राच्या पवित्र भुमिमधून त्यांना हाकलून हिमालयात पाठवा अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या वतीने क्रांतीचौक भागात त्यांचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मनीषा कायंदे, विनोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
राज्यपालांना हिमालयात पाठवा राज्यपालांना म्हातारंचळ लागल्याने काही बोलत आहेत. महाराष्ट्राच्या पवित्र भूमिमधून त्यांना हाकलून द्या. ते हिमालयाचे आहेत, त्यांना तिथेच पार्सल करा. आता भाजप शिवाजी महाराजांचा अवमान का सहन करत आहे. त्यांना परत पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.
भाजपला महाविकास आघाडी सरकार पडायचे होते. त्यामुळे या राज्यपालांना हाताशी घेऊन अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यपालांचे कार्यालय जणू भाजपचे कार्यालय आहे अस वाटत आहे. सरकार पाडण्याचा त्यांचा हेतू सध्या झाला. नियमबाह्य सरकार राज्यात आहे. राज्यपाल महाराजांचा अवमान करत आहेत. त्यांना खरतर मराठी माणसाचा अवमान करायचा आहे. त्यामुळं हिमालयातील पार्सल परत पाठवा अशी मागणी केल्याचं शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितलं.