ETV Bharat / state

सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत - holiday

शाळेचा पहिला दिवस हा जीवनातला महत्वाचा टप्पा मानला जातो. हा दिवस आनंददायी आणि आठवणीत राहणारा असावा यासाठी औरंगाबादेत विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबविण्यात आले. अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढते, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी रेन डांस केला.
author img

By

Published : Jun 17, 2019, 4:49 PM IST

औरंगाबाद- उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी विविध शाळांनी अनोखे उपक्रम राबवले. औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी रेन डांस केला. तर सिंदोनच्या जिल्हापरिषद शाळेने यावेळी विद्यार्थ्यांना घोड्याची सफरही घडवली.

शाळेचा पहिला दिवस हा जीवनातला महत्वाचा टप्पा मानला जातो. हा दिवस आनंददायी आणि आठवणीत राहणारा असावा यासाठी औरंगाबादेत विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबविण्यात आले. अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढते, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी रेन डांस केला. तर सिंदोनच्या जिल्हापरिषद शाळेने यावेळी विद्यार्थ्यांना घोड्याची सफरही घडवली.

शाळा सुरू झाली की लहान मुलांना शाळेत जायला अवघड वाटते. विशेषतः पहिल्यांदा शाळेत जाणारी मुलं ही भीत असतात. ही भीती दूर व्हावी या उद्देशाने आता विविध उपक्रम राबवले जात आहेत. औरंगाबादमध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची भिती वाटू नये, शाळा ही घरासारखी वाटावी म्हणून शहरातील सिडकोमध्ये असलेल्या मुकूल विद्यालयात चक्क रेन डान्सचे आयोजन करण्यात आले. या रेन डान्समध्ये सांग सांग भोलानाथ म्हणत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी धम्माल केली. तर सिंदोनच्या जिल्हापरिषद शाळेत मुलांना घोडेस्वारीचा आनंद शाळेने दिला.

Intro:उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या, शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी विविध शाळांनी अनोखे उपक्रम राबवले. औरंगाबादच्या मुकुल मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी रेनडांस केला. तर सिंदोनच्या जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांना शाळेने घोड्याची सफर घडवली.Body:शाळेचा पहिला दिवस हा जीवनातला महत्वाचा टप्पा मानला जातो. हा दिवस आनंददायी आणि आठवणीत राहणारा असावा यासाठी औरंगाबादेत विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबविण्यात आले. अश्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढते असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.Conclusion:औरंगाबादमध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शाळेची भिती वाटू नये, शाळा ही घरासारखी आवडावी म्हणून शहरातील मुकूल विद्यालयात चक्क रेन डान्सचे आयोजन करण्यात आले. या रेन डान्समध्ये सांग सांग भोलानाथ म्हणत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी धम्माल केली. शाळा सुरू झाली की लहान मुलांना शाळेत जायला अवघड वाटतं. विशेषतः पहिल्यांदा शाळेत जाणारी मुलं ही भीत असतात. ही भिती दूर व्हावी या उद्देशाने आता विविध उपक्रम राबवले जातायत. औरंगाबाद शहरातील सिडकोमध्ये असलेल्या मुकूल विद्यालयात आज वेगळं चित्र पाहायला मिळालं. सध्या पाऊस नसला तरी विद्यार्थ्यांनी रेन डान्स करून मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला. त्यानंतर मुलं आपल्या वर्गात आनंदाने जाऊन बसली. पूर्वी लहान मूल पावसात मनमुराद खेळायचे, मात्र आज मुल पावसात भिजत नाहीत, त्यामुळे पहिल्या पावसात विद्यार्थ्यांना भिजण्याचा आनंद देखील दिला जातो. तर सिंदोनच्या जिल्हापरिषद शाळेत मुलांना घोडेस्वारीचा आनंद शाळेने दिला.
BYTE: विद्यार्थी
BYTE: सुनीता कुलकर्णी, मुख्याध्यापक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.