ETV Bharat / state

Sparrows School : 'या' शहरात चक्क भरते चिमण्यांची शाळा; मनपा शाळेचा अनोखा उपक्रम

तुम्ही कधी चिमण्यांची शाळा (School of sparrows) बघितली आहे का? मात्र अशीच एक चिमण्याची शाळा औरंगाबाद शहरातील बायजीपूरा भागात (School of sparrows in Baijipura area) भरते. महानगर पलिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत चिमण्यांचा (School of Sparrows in Mahanagara Palika School) देखील चिवचिवाट शाळेत पहायला मिळतो. एकीकडे चिमण्या नामशेष होत असतांना शाळेने चिमण्यासाठी केलेला आनोखा उपक्रम चर्चोचा विषय ठरला आहे.

Sparrows School
Sparrows School
author img

By

Published : Aug 10, 2023, 10:28 PM IST

Updated : Aug 10, 2023, 10:58 PM IST

मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके माहिती देताना

औरंगाबाद : काही शाळांमधे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांच्या व्यतिरिक्त ज्ञान प्राप्त होते.त्यातून अनेक छंद देखील जोपासले जातात. अशीच एक अनोखी शाळा शहरात भरते. ही शाळा मुलांची आहेच, मात्र या शाळेला वेगळी ओळख देखील आहे. ती म्हणजे चिमण्यांची शाळा. या शाळेत जवळपास पाचशे चिमण्या रोज वास्तव्यास असतात. त्यांना असणारे पोषक वातावरण असल्याने मुलांप्रमाणे त्या देखील बिनधास्त वावरतात. त्यांना ना जीवाची काळजी असते ना कोणाची भीती, त्यामुळे त्या अगदी मनमोकळ्या प्रमाणे वावरतात. म्हणूनच या शाळेला चिमण्यांची शाळा देखील म्हणले जाते.

तीन वर्षांपासून चिमण्यांचा वावर वाढला : बायाजिपूरा येथील मनहागर पलिकेची शाळा (A school of sparrows in Baijipura area) गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच चर्चेला आली. शाळेत शिक्षण चांगले मिळते. गोरगरीब विद्यार्थी घडले जातात म्हणून ही ओळख आहेच. मात्र, त्याबरोबर मुलांसोबत चिमण्या देखील शिकायला येतात असे म्हटले जाते. शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांच्या माध्यमातून वेगळा बदल शाळेत पाहायला मिळाला. निसर्ग चक्र सुरू राहण्यासाठी पक्षी जगणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शहरी भागात दुर्मिळ होत चाललेली चिमणी जागवण्यासाठी शाळेत विशेष प्रयत्न केले गेले. प्रत्येक वर्गाच्या बाहेर एक घरटे तयार करण्यात आले. त्याठिकाणी त्यांना अन्न, सुरक्षा मिळावी असे प्रयत्न केले गेले. विद्यार्थ्यांना चिमण्यांचे महत्त्व सांगितले. निसर्गाचा समतोल ठेवण्यात चिमण्यांचा सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आल्यावर आलेल्या चिमण्यांना त्रास न देता वावरू लागले. परिणामी मागील तीन वर्षांमध्ये पाचशेहून अधिक चिमण्यांचा वावर परिसरात सुरू झाला.

चिमण्यांचा मुक्त वावर : पक्षी निसर्गासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना लहानपणापासून त्यांचे महत्त्व कळावे. याकरिता बायजीपूरा मनपा शाळेत प्रयत्न केले जात आहेत. पक्षी किती महत्वाचे असतात, ते जगणवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते, त्यांचे जतन करायसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जाते. चिमणी मित्र संजय गुरव यांचे मार्गदर्शन त्यासाठी वेळोवेळी घेतले जाते. शाळेत त्यांना निवारा, अन्न, सुरक्षित वातावरण मिळते. वर्ग खोलीच्या बाहेर एक घरटे तयार करण्यात आले. तीन वर्षात शाळा इमारतीत साठ घरटी उभारण्यात आली. त्यामधे रोज पाचशेहून अधिक चिमण्या येत असतात. विद्यार्थ्यांच्या गदारोळात ही या चिमण्यांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. चिमण्यांची मागील तीन वर्षांमध्ये सहावी पिढी शाळेत वास्तव्य करत आहे, अशी माहिती शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी दिली.

झाडांची काळजी घेतली जाते : पक्ष्यांचा वावर वाढवायचा असेल, तर झाड तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच शाळा परिसरात झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे मोठ्या झाडांवर पक्षांचा वावर वाढू लागला. इतकच नाही तर शाळेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावल्यावर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. एका झाडाला चार विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. प्रत्येक झाडाच्या बाजूला त्या मुलांचे फोटो, नाव लावण्यात आले. परिसराची काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे, झाडांची निगा घेणे अशी कामे ते विद्यार्थी करतात. आपले झाड सर्वात चांगले असावे याकरिता मुले प्रयत्न करतात. त्यामुळे परिसरातील झाडे टिकत असून त्यात पक्षांचा वावर वाढल्याची माहिती शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी दिली.

Last Updated : Aug 10, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.