ETV Bharat / state

शांतिगिरी महाराजांची लोकसभेच्या रिंगणातून माघार, मतदान जनजागृती करणार - loksabha election

वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे स्पष्ट केले.

शांतिगिरी महाराज
author img

By

Published : Apr 3, 2019, 7:06 PM IST

औरंगाबाद - वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शांतिगिरी महाराजांनी आपली भूमिका जाहीर केली.

शांतिगिरी महाराज पत्रकार परिषदेत बोलताना

महाराजांनी यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास १ लाख २३ हजार मते मिळवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये भक्तांच्या सांगण्यावरून बाबांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. पण, या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. त्यामुळे महाराज निवडणूक लढवतील, अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवायची नसून आपण फक्त मतदान जनजागृती करणार असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.

इतकेच नाही तर बाबांचा भक्त परिवार निवडणुकीच्या काळात मतदान जनजागृती करणार असून घराघरात जाऊन मतदान मोठ्या संख्येने करा, असे आवाहन करणार आहे. त्याचबरोबर उमेदवार कसा असावा, याबाबतचे निकषही मतदारांना समजून सांगितले जाणार आहेत. उमेदवार हा शिक्षित, सभ्य आणि इमानदार असावा, असे निकष बाबाजींनी लावले आहेत. शांतिगिरी महाराज यांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी भेट दिली असून दोघांनीही आशीर्वाद मागितले असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले. तरी ९ एप्रिल नंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असेही शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Intro:वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. औरंगाबाद पत्रकार परिषद घेऊन शांतिगिरी महाराजांनी आपली भूमिका जाहीर केली.

Body:शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलं नसल्याचं शांतिगिरी महाराज यांनी स्पष्ट केलं.

Conclusion:वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी याआधी 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळेस बाबांनी जवळपास एक लाख 23 हजार मते मिळवली होती. त्यानंतर 2014 मध्ये भक्तांच्या सांगण्यावरून बाबाजी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र 2019 च्या निवडणुकीत शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. त्यामुळे शांतिगिरी महाराज निवडणूक लढवतील अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र या चर्चेला शांतिगिरी महाराज यांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची निवडणूक सध्या लढवायची नसून आपण फक्त जनजागृती करणार असल्याचं महाराजांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर बाबाजींचा भक्त परिवार निवडणुकीच्या काळामध्ये मतदान जनजागृती करणार असून घराघरात जाऊन मतदान मोठ्या संख्येने करा असे आवाहन करणार आहे. त्याचबरोबर उमेदवार कसा असावा याबाबतचे निकषही मतदारांना समजून सांगितले जाणार आहेत. उमेदवार हा शिक्षित, सभ्य आणि इमानदार असावा असे निकष बाबाजींनी लावले आहेत. शांतिगिरी महाराज यांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी भेट दिली असून दोघांनीही आशीर्वाद मागितले असल्याचं महाराजांनी यावेळी सांगितलं. तरी नऊ एप्रिल नंतर आपण पुढचा निर्णय घेऊ असंही शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.