ETV Bharat / state

पंधरा दिवसानंतर एकाच रात्रीत बारा दुकाने फोडली

सईदा कॉलनीत नितीन अशोक परमार (३०, रा. कुंवारफल्ली, राजाबाजार) यांचे जयदेव सेनेट्री हार्डवेअर नावाचे दुकान आहे. हे रात्री जेवण केल्यानंतर दुकानावरील मजल्यावर रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करत होते. त्यानंतर ते तेथेच झोपी गेले. पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोराने हार्डवेअरचे साहित्य, रोख तीन हजार, लक्ष्मी मातेचा फोटो, चांदीचे शिक्के असे साहित्य लंपास केले.

sanitization shop brake by thives in aurangabad

author img

By

Published : Aug 24, 2020, 8:29 PM IST

औरंगाबाद - पंधरा दिवसानंतर चोरांनी पुन्हा डोकेवर काढत एकाच रात्रीत विविध भागात तब्बल बारा दुकानांचे शटर उचकटले. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. जटवाडा रोड, हर्सुल, जयभवानीनगर, कामगार चौक अशा भागांचा यामध्ये समावेश आहे. या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. त्यातून किरकोळ साहित्य आणि रोख चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या १० आॅगस्टला पहाटे चोरांनी क्रांतीचौकातील चार शटर फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शटर फोडीच्या घटना घडल्या आहेत.

क्रांतीचौक, मोंढा भागात दुकान व कार्यालयाची शटर फोडल्याची घटना ताजी असताना आज पहाटे चोरांनी जटवाडा रोड, हर्सुल, जयभवानीनगर, कामगार चौक या ठिकाणी शिरुन दुकाने फोडली. हर्सुल, जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत नितीन अशोक परमार (३०, रा. कुंवारफल्ली, राजाबाजार) यांचे जयदेव सेनेट्री हार्डवेअर नावाचे दुकान आहे. हे रात्री जेवण केल्यानंतर दुकानावरील मजल्यावर रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करत होते. त्यानंतर ते तेथेच झोपी गेले. पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोराने हार्डवेअरचे साहित्य, रोख तीन हजार, लक्ष्मी मातेचा फोटो, चांदीचे शिक्के असे साहित्य लंपास केले. तसेच परिसरातील प्रभाकर मिरधे यांचे गणेश मेडिकल स्टोअर्स, अलिम देशमुख यांचे अंबर मेडिकल, गणेश गाडेकर यांचे सिध्दीका मेडिकल फोडण्यात आले. त्यातून काहीही चोरीला गेले नाही.

माऊली कलेक्शनमधून जिन्स पँट, किशोर हार्डवेअरमधून रोख, मोबाईल, धनश्री मोबाईल शॉपीतून तीन जुने मोबाईल, पौर्णिमा फोटो स्टुडिओमधून दोन महागडे कॅमेरे, काशीद पंक्चरमधून साहित्य सितारा पान सेंटरमधून पुड्या, सिगारेट, चिल्लर असा ऐवज चोरांनी लांबवला. तसेच कामगार चौकातील महेश माळी यांच्या गुरुदत्त स्टेशनर्समधून पाचशे रुपये आणि अथर्व लंच होममधून नेमके काय चोरीला गेले. याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, पोलिस नाईक राजेंद्र सोळुंके यांनी धाव घेत पाहणी केली. यातील चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.