छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. खोके खोके म्हणता तर एखाद खोक पकडून दाखवा. इतके आमदार खासदार गेले आता उरलेले एकनाथ शिंदे साहेब कधी बोलावतात याची वाट पाहत आहेत, असे भुमरे म्हणाले. तसेच लवकरच आदित्य ठाकरेंसह इतर आमदार शिवसेनेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे.
ठाकरे गटावर टीका : नियोजन सभेत बोलताना आमदार भुमरे म्हणाले की, एका पेपरला काही काम नाही, सामना हा पेपर फक्त फेसबुकपुर्ता आहे. आमच्या पैठणमध्ये सामानाचे 12 पेपर येतात, त्यांच्या काही लोकांनी मला खासगीत सांगतले की खोक बोलल्यावर लोक आता शिव्या देत आहेत, अशी टीका भुमरे यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेच्या नियोजन बैठकीत त्यांच्यासह अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली.
शिरसाटांची अंधारेंवर टीका : ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत, काय काय लफडे केले तिने काय माहित, अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली. आमची हयात गेली पक्षात आणि मागून येऊन या आम्हाला मार्गदर्शन करणार का? राजकारणात काही होत हे लक्षात ठेवा. अंबादास दानवेंनी मला फोन केला, म्हणे ती बाई डोक्याच्या वर झाली आहे. मागे एकदा आली तर गेस्ट हाऊस मधे राहण्याची सोय केली म्हणून मातोश्रीला वहिनींकडे तक्रार केली. त्यानंतर अर्ध्या तासात चांगल्या हॉटेलमध्ये सोय करावी लागली. आधी अस नव्हते, मोठे मोठे नेते यायचे खेड्यात जायचे, तिथेच मिळेल ते खायचे आणि राहायचे, असे आमदार शिरसाट म्हणाले. कोणीही आजकाल सोशल मिडियावर 20-22 वर्षाच पोरग उठल की कमेंट करत गद्दार, खोके अरे घरात बघ काय चालले आहे, असा टोला नेटकऱ्यांना शिरसाटांनी लगावला.
मुख्यमंत्री खूप काम करतात : आताचे मुख्यमंत्री रात्री 3 वाजता पण भेटतात आधीचे तर दुपारी 3 वाजता देखील भेटत नव्हते. अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना आम्ही 12 हजार कोटी रुपये मदत केली, इतकी मोठी मदत राज्य स्थापन झाल्यापासून आतापर्यंत कोणी केली नाही, देशात कोणत्याही राज्याने दिली नाही. येणाऱ्या निवडणुकीत दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल तसेच निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि पक्ष दिला, त्यांच्याकडे शपथपत्र होते ते असकी की नकली, रात्रभर कुठे तयार होतात हे आम्हाला माहीत आहे. शिवसेना कोणाची यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे, दिल्लीत शिक्कामोर्तब झाला तो फायनल होतो. काही लोक नामांतराचे राजकारण करतात मला त्यात पडायचं नाही, सरकारचा निर्णय अंतिम असतो, आतापर्यंत किती शहराचे नाव बदललीत, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची सभा : सत्तार पुढे म्हणाले की, 5 तारखेला शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आम्ही आयोध्येला जात आहे. तिथे शिवसेना पक्षाचे चिन्ह धानुष्यबानचे पूजन होईल. त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य रॅली काढण्यात येईल. येत्या 8 किंवा 9 तारखेला मुख्यमंत्री शिंदे आणि अनेक मंत्री शहरात येणार आहेत. यावेळी नामांतराच्या समर्थनार्थ शहरात भव्य रॅली काढणार असून 4-5 तासांचा कार्यक्रम होईल. ही रॅली न भुतो न भविष्यती अशी निघणार आहे. टिव्ही सेंटर भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते सभा घेतील, अशी माहिती मेळाव्यात देण्यात आली.
हेही वाचा : New Tital To Bacchu Kadu: बच्चू कडू हे 'अपंग हृदयसम्राट'; नवीन उपाधी देत प्रतिमेला दुग्धाभिषेक