ETV Bharat / state

अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार - Anuradha Patil

प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर केला. एक लाख रुपये आणि ताम्रपट, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Anuradha Patil
अनुराधा पाटील
author img

By

Published : Dec 19, 2019, 3:55 PM IST

औरंगाबाद - 2019 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. 23 भाषांतील साहित्यिकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये सात कवितासंग्रह, चार कादंबरी, सहा लघुकथासंग्रह, तीन निबंध संग्रह, एक काल्पनिक कथासंग्रह, आत्मचरित्र, चरित्र ग्रंथ यांचा समावेश आहे.

आत्मपरा आणि सभोवतालचा परिसर यांचा समतोल साधत असलेल्या अनुराधा पाटील त्यांच्या कविता साहित्य प्रेमींना नेहमीच अभ्यास आणि कौतुकाचा विषय राहिलेला आहे. या आधी त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस आणि वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. दिगंत या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला असून त्यांच्या इतर कवितासंग्रहास सुद्धा अनेक नामवंत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमीचा पुरस्कार हा साहित्य वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या काळातील प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात आली. या अनपेक्षित पुरस्काराने भारावले असून साहित्य प्रेमींनी नेहमीच प्रेम दिले त्यामुळे पुरस्कार मिळाल्याची भावना अनुराधा पाटील यांनी व्यक्त केली.

Intro:औरंगाबादच्या प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार साहित्य अकादमीने आज जाहीर केला. एक लाख रुपये आणि ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.Body:2019 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. 23 भाषांतील साहित्यिकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये सात कवितासंग्रह, चार कादंबरी, सहा लघुकथासंग्रह, तीन निबंध संग्रह, एक काल्पनिक कथासंग्रह, आत्मचरित्र, चरित्र ग्रंथ यांचा समावेश आहे.Conclusion:आत्मपरा आणि सभोवतालचा परिसर यांचा समतोल साधत असलेल्या अनुराधा पाटील त्यांच्या कविता साहित्य प्रेमींना नेहमीच अभ्यास आणि कौतुकाचा विषय राहिलेला आहे. या आधी त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस आणि वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. दिगंत या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला असून त्यांच्या इतर कवितासंग्रहास सुद्धा अनेक नामवंत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा साहित्य वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या काळातील प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नवी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात आली. या अनपेक्षित पुरस्काराने भारावले असून साहित्य प्रेमींनी नेहमीच प्रेम दिल त्यामुळे पुरस्कार मिळाल्याची भावना अनुराधा पाटील यांनी व्यक्त केली.
Byte - अनुराधा पाटील - पुरस्कार विजेत्या कवियत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.